जगाव का मरावं कंपनीतील कामगारांना वेतन अदा न केल्याने उपासमारीची पाळी.

0
643

हाजी बाबा इन्फ्रा व बिल्डमेंट कडील वेतन अदा करा कामगाराची मागणी…

 

 दीरगाईच्या धोरणाला जबाबदार कोण ?

 

Impact 24 news

तालुका प्रतिनिधी/पुरुषोत्तम गेडाम

यवतमाळ/झरी जामणी :- झरी तालुक्यातील मुकडबन हे औदयोगीक दृट्या विकसीत होत असुन मागील दोन वर्षा पासून आर.सी.सी.पी.एल.कंपनी अंतर्गत हाजी बाबा इन्फ्रा व बिल्डमेट कंपनीचे काम चालू असताना कोरोनाचे कारण समोर करून कंपनीने काम बंद करून कामगारांवर उपास मारीचे कारण समोर केले पण त्या आधी कामातील कामगारांचे वेतन अदा न करता कामगारांच्या कामाच्या जखमेवर मीठ्ठ चोळण्याचा प्रकार कंपनी व्यवस्थापक याच्या कडून सुरु असून हा कामगारांचा अंत पाहण्याचा प्रकार असून गरज सरो,वैद्य मरो,काम झाले काय करू तुम्हचे असा प्रकार सुरु झाला असल्याने सर्व संबंधित कामगारांने कंपनी धोरणा विरोधात कंपनी समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला असून या चालू कोरोना काळात कोरोना प्रोटोकॉल लक्षात घेता,समझोता करून काम घ्या वेतन द्या या अटीवर जुन 21/06/2021 RCCPL (MP Birla group) कंपनी गेट क्र 2 जवळ वाजता 7.30 इन्फ्रा व बिल्डमेट हाजी बाबा विरोधात धरना आंदोलन करण्यात येणार आहे असे सूचना पत्र मुकुटबन स्टेशन देण्यात आले आहे. कामगाराच्या न्यायासाठी या आंदोलनाला शिवक्रांती कामगार संघटनेचे अध्यक्ष आशिष झाडे यांनी जाहीर पाठिंबा घोषित केला असुन,हे आंदोलन याच्या नेतृत्वात होणार असून कामगाराच्या हक्कासाठी एकता दाखवा असे आव्हान आशिष झाडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here