गांव तेथे शाखा ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपक्रमास मूल तालुक्यात आरंभ ! 

0
599

गांव तेथे शाखा ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपक्रमास मूल तालुक्यात आरंभ ! 

 

विशेष प्रतिनिधी/✍🏻किरण घाटे

 

 विदर्भ/चंद्रपूर /मूल :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे एका सुचनेच्या अनुषंगाने मूल तालुक्यात “गांव तेथे शाखा “हा उपक्रम नुकताच आरंभ झाला असुन या निमित्ताने मूल शहरात दि.१८जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला .या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके , मूल तालुकाध्यक्ष गंगाधर कुनघाडकर ,युवा नेते अशाेक मार्गनवार , भास्कर खाेब्रागडे , अनिल नरुले ,सरस्वती गांवडे , सुमित्रा वैद्य , लता खाेब्रागडे , ,चंदा काेरेकर , वैशाली आकुनवार , प्रणाली वाडगुरे , गायत्री भरतकर , जयश्री झरकर , काैशल्या जेंगठे , लक्ष्मी काेल्हे आदीं उपस्थित हाेते.

पक्ष संघटन मजबूत करण्याच्या द्रूष्टीकाेणातुन हा उपक्रम मूल तालुक्यासह जिल्ह्यात राबविण्यांत येत असल्याचे मूल राष्ट्रवादी शहर महिलाध्यक्षा तथा संजय गांधी निराधार याेजनेच्या विद्यमान सदस्या अर्चना चावरे यांनी सांगितले .दरम्यान या माेहिमेला उत्तम व उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याच्या चावरे या वेळी म्हणाल्या . मूल शहरातील काही भागात या शाखा नव्याने निर्माण करण्यांत आल्या असून त्यास महिला कार्यकर्त्यांचा भरघाेस प्रतिसाद मिळत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here