महाकाली नगरीत गणेश जयंती व मूर्ती उत्सव समारंभ साजरा

209

महाकाली नगरीत गणेश जयंती व मूर्ती उत्सव समारंभ साजरा

घुग्घुस येथून काही अंतरावर म्हातारदेवी गावाच्या परिसरात महाकाली नगरी येथे गणेश जयंती व मुर्ती स्थापना दिवस वर्ष २ रे उत्सवात साजरा करण्यात आला. सकाळी १० वाजता पुजा, हवन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मार्गदर्शन केले. जेष्ठ नागरिकांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम वडस्कर यांनी आभार व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, हेमराज बोंबले उपस्थित होते.

महाप्रसाद वाटप करण्यात आले. सर्व परिसरातील नागरिक उपस्थित होऊन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाकाली नगरी गणेश मंडळ अध्यक्ष पुरुषोत्तम वडस्कर, उपाध्यक्ष अमोल खिरटकर, निखिल बोधे, सचिव संदीप चांबारे, कोषाध्यक्ष प्रमोद उपाध्ये, महिला कमेटी अध्यक्ष सौ. मंदा बोधे व उपाध्यक्ष सौ. किशोरी तातावार आदी उपस्थित होते.

advt