श्री प्रभू रामचंद्र विद्यालयात महापरिनिर्वाण दिन संपन्न

0
502

श्री प्रभू रामचंद्र विद्यालयात महापरिनिर्वाण दिन संपन्न

 

नांदाफाटा : श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गुरुकुल कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सद्गुरु जगन्नाथ बाबा शिक्षण महाविद्यालय व शिव वैभव इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने आज विद्यालयाच्या सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न झाला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल मुसळे गुरुकुल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आशिष पैनकर, डॉ. राजेश डोंगरे, डॉ. प्रशांत पुराणिक सहाय्यक शिक्षक रामकृष्ण रोगे, संदीप खिरडकर, संगीता पाहणपटे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रमोद वाघाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गीत सादर केले. अध्यक्ष डॉ. अनिल मुसळे यांनी आजच्या स्पर्धात्मक व धकाधकीच्या युगामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या दूरदर्शी विचारांची अत्यंत गरज आहे व प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार बाळगून आत्मसात करुन त्या दृष्टीने वर्तवणूक करण्याचा सल्ला उपस्थितांना दिला. विकास दुर्योधन यांनी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजावे यासाठी मौलिक असे मार्गदर्शन विविध दाखले देत केले. शिवाय आंबेडकर काळातील स्थिती आणि आजची स्थिती त्याच्यातील तफावत सुद्धा त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून बोलून दाखवली कार्यक्रमाचे संचालन अरुण कुचनकर यांनी केले तर आभार साहेब शिक्षक प्रवीण कुरसंगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here