कामगारांवरील अन्याय कदापिही सहन करणार नाही – आ. किशोर जोरगेवार

0
1002

कामगारांवरील अन्याय कदापिही सहन करणार नाही – आ. किशोर जोरगेवार

सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांसाठी यंग चांदा ब्रिगेडचे आंदोलन !
🟥🟡🌼🌀चंद्रपूर🟥🟩🌼किरण घाटे🟡🟩🌼
गत 15 ते 20 वर्षापासून चंद्रपूर फेरो अलाय प्लांट इम.ई.एल. येथील सुरक्षा रक्षक कंपणीची मालमत्ता सुरक्षीत ठेवण्याचे काम करत आहे. मात्र स्वताच्या स्वार्थासाठी यातील काही कामगारांना शारिरीक व वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरविण्यात आले आहे. हा कामगारांवर अन्याय असून हा अन्याय आम्ही सहन करणार नाही असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
🌼🟩🟥🟡एम. ई. एल. येथील सुरक्षा रक्षकांच्या व कामगारांच्या मागण्यांसाठी आज सोमवार दि. ८फेब्रुवारीला एम.ई.एल. गेट समोर यंग चांदा ब्रिगेडच्या स्टिल कामगार संघटनेच्या वतीने एक दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 🟩🟡🟥🌼🟣या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे बाळकृष्ण जुवार, रुपेश झाडे, यंग चांदा ब्रिगेड कामगार संघटनेचे विश्वजीत शाहा, आनंद रणशूर, हरमन जोसेफ, राम मेंढे, वंदना हातगावकर, तापूश डे, करणसिंह बैस, दिनेश इंगळे, तिरुपती कलगुरवार, कौसर खान, दुर्गा वैरागडे, चंद्रशेखर देशमूख, आशा देशमूख यांच्यासह सुरक्षा रक्षक व कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
🟩🌼🟥🟡🟣🟣 येथील फेरो अलॉय कंपणीत कार्यरत १२१ सुरक्षा रक्षक हे कंत्राटी पध्दतीवर कार्यरत आहे. आता या सुरक्षा रक्षकांना चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळा मार्फत नोंदनिकृत करण्यात येणार आहे. सदरहु प्रक्रिया सुरुही झाली आहे. या प्रक्रियेत अनेक सुरक्षा रक्षकांना जाणीवपूर्वक शारिरीक व वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामूळे मागील अनेक वर्षापासून येथे कार्यरत या सुरक्षा रक्षकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. ही बाब अन्याय कारक असून येथील १२१ सुरक्षा रक्षकांना चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत नोंदनिकृत करून पूर्ववत कामावर घेण्यात यावे या प्रमूख मागणीसह येथील कामगारांवर होणां-या अन्याया विरोधात तसेच इतर मागण्यांसाठी उपराेक्त आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलतांना आमदार जोरगेवार म्हणाले कि, एम.ई.एल. येथे काम करणा-या कामगार व सुरक्षा रक्षकांमूळे ही कंपणी मोठी झाली आहे. त्यामूळे कामगारांना सन्मान दिला गेला पाहिजे, येथील सुरक्षा रक्षक मागील 15 ते 20 वर्षापासून सेवा करत आहे. मात्र त्यांना आता जिल्हा सुरक्षा मंडळ नोंदनिच्या नावाखाली तपासणी करुन अपात्र ठरविण्याचा कट रचल्या जात असल्याचा आरोप करत कामगारांवरील हा अन्याय सहन केल्या जाणार नाही असा इशारा यावेळी आ. जोरगेवार यांनी दिला. 🟡🟣💠🟥🟩तसेच येथील सर्व सुरक्षा रक्षकांना जिल्हा सुरक्षा मंडळा मार्फत नोंदनिकृत करण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले, यावेळी एका शिष्ट मंडळाने एम.ई.एल. येथील व्यवस्थापनाची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here