वेकोलिचा लोखंडी पूल नागरिकांना रहदारीसाठी लवकरच सुरु होणार- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

0
356

वेकोलिचा लोखंडी पूल नागरिकांना रहदारीसाठी लवकरच सुरु होणार- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

घुग्घुस शहरातील बँक ऑफ इंडियाजवळ वेकोलि परिसराला जोडणारा ३० वर्षे जुना लोखंडी पूल रेल्वे प्रशासनाने गुरुवार १९ जानेवारीपासून दुचाकीच्या रहदारीसाठी अचानक बंद केला.

सध्या राजीव रतन चौकातील रेल्वे फाटकाजवळ निर्माणाधीन उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. यामुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याने शालेय बसने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी उशीर होत आहे. तसेच रुग्णवाहिका, महामंडळाच्या बसेस अडकल्याने रुग्णांना व प्रवाश्यांना फटका बसत आहे.

वेकोलि परिसरात इंदिरानगर, गांधीनगर, सुभाषनगर, शास्त्रीनगर, शालिकरामनगर अशा मोठया वसाहती आहेत. या वसाहतीत राहणाऱ्यांसह घुग्घुस वस्तीत राहणारे दुचाकी वाहनधारक लोखंडी पूला वरून ये-जा करीत होते. परंतु पूल बंद झाल्याने त्यांना राजीव रतन चौकातून वाहतूक करावी लागत आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी हा लोखंडी पूल नागरिकांच्या रहदारीसाठी सुरु करण्याकरिता वेकोलि अधिकारी व रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार हे गुरवार, २६ जानेवारी रोजी घुग्घुस शहरात आले असता भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकोलिच्या लोखंडी पूलाच्या समस्येबाबत त्यांना सांगितली व प्रत्यक्ष वेकोलिच्या लोखंडी पूलाची पाहाणी केली. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तत्काळ समस्येची दखल घेत रेल्वेचे अधिकारी व वेकोलिचे महाप्रबंधक यांना निर्देश देत लोखंडी पूलाची दुरुस्ती करून लवकरात लवकर सुरु करण्यास सांगितले.

त्याअनुषंगाने वेकोलिने लोखंडी पूलाची दुरुस्ती सुरु केली आहे. त्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. वेकोलिचा लोखंडी पूलाची दुरुस्ती सुरु झाल्याने लवकरच नागरिकांना दुचाकीच्या रहदारीसाठी सुरु करण्यात येणार आहे.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, भाजपाचे सिनु इसारप, अमोल थेरे, राजेश मोरपाका, सन्नी खारकर, चिन्नाजी नलभोगा, स्वप्नील झाडे, सुरेंद्र भोंगळे, दिनेश बांगडे, कोमल ठाकरे, विक्की सारसर, असगर खान व मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here