लॉकडाऊन करणं म्हणजे लोकांचं कंबरडं मोडण्यासारखी परिस्थिती : प्रकाश आंबेडकर

0
464

लॉकडाऊन करणं म्हणजे लोकांचं कंबरडं मोडण्यासारखी परिस्थिती : प्रकाश आंबेडकर

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सरकारने काही भागांत लॉकडाऊन करण्यास सुरुवात केली आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी सर्वसामान्य जनतेची, विक्रेत्यांची ज्यांचे हातावर पोट चालते अशांची बाजू घेत सरकारवर निशाणा साधला आहे.
लॉकडाऊन पेक्षा नियंत्रणावर सरकारने जास्त भर देण्याची गरज असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. दुकानदारासहित त्यांच्या एम्प्लॉयचे कोविड टेस्ट करून घ्या. जो पॉझिटिव्ह असेल तो दवाखान्यात जाईल आणि जो निगेटिव्ह असेल त्याला दुकानावर बसता येईल व व्यवहार सुरू राहील.
लॉकडाऊन करणं म्हणजे लोकांचं कंबरडं मोडण्यासारखी परिस्थिती आहे त्यामुळे या लॉकडाऊनला आमचा पूर्णपणे विरोध आहे. शासनाने या सर्वाचा विचार करून योग्य ती पॉलिसी करावी अशी विनंती नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here