श्रीराम सेवा समिती कोरपणा कडून राम मंदिर भूमिपूजन सोहळा उत्साहात साजरा
अखिल ब्रम्हांडावर पसरलेल्या एकमेव एकछत्री रामराज्याच्या , या भरतभुमीच्या राजाचा,
असंख्य नरविरांनी आपलं रक्त सांडवुन अनादी युगापासुन ज्वलंत ठेवलेल्या परम पवित्र विजयी भगव्या ध्वजाच्या ध्वजपतीच तख्त जिथं विराजमान आहे ते ठिकाण म्हणजे अयोध्या
मर्यादापुरूषोत्तम प्रभुश्रीरामचंद्राच तख्त जे आक्रमकांनी उध्वस्त केलं होतं ती हिंदुंस्थानाची अस्मिता जपण्यासाठी कित्येक कारसेवकांनी बलिदान दिलं. शेकडो वर्ष ज्या क्षाणाची सारा हिंदुस्थान वाट पाहत होता, त्या सर्वांच फलित म्हणजे हिंदुस्थान चा कालचा सुवर्णदिवस
रघुकुलराज प्रभु श्री रामचंद्रांच्या मंदिराच्या उभारणीचा दिवस.

धर्म, पंथ पक्ष,जात सारे भेद विसरूंन
घरोघरी भगवा ध्वज , दिवे लावुन श्री राम जपाने हा सुवर्णक्षण साजरा करून हिंदुस्थानच्या विजयीवाटचालीसाठी मागण मागीतलं.
याप्रसंगी श्रीराम सेवा समिती कोरपनाचे कडून एकशे एक किलो बुंदीचा प्रसाद वाटून व ध्वजारोहण करून, राम मंदिर आंदोलनातील सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यात आली व सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले सायंकाळी सर्व मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला,
कार्यक्रमाचे आयोजकानी सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त केले ज्यामध्ये
जिल्हा बँकेचे संचालक विजयराव जी बावने अध्यक्ष म्हणून आणि त्यांसोबत, सुनील भाऊ बावने, सुभाष भाऊ तुरांनकर , शेतकरी संघटनेचे अरुण पाटील नवले , प्रदीप भाऊ पिंपळशेंडे ,नीतीन बावने, भाजपा तालुका प्रमुख नारायण हिवरकर, किशोरराव जी बावने, विशाल भाऊ गज्जलवार, पुंडलिकजी गिरसावळे,अमोल आसेकर, बालू पानघाटे, अरवींद भाऊ मसे शिवसेना तालुकाप्रमुख, आणि असंख्य रामभक्त सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी “श्रीराम सेवा समिती कोरपणा” चे अध्यक्ष सतीश भाऊ गज्जलवार, दिनेश राठोड, पांडुरंग वरभे, महेंद्रजी कोमावर, विजय भाऊ गिरडकर, विनेश पडगिलवार, सुभाष नागपुरे, प्रशांत पेन्शनवार, बलवंत ठाकूर, सुरज खोबरकर अर्जुन ठाकूर,मीनाथ महाराज, जगदीश पेटकर, सह अनेक राम भक्तानीं सहकार्य केले, आयोजकांकडून सर्वांचे आभार.