अवैध दारू विक्रेता व सट्टापट्टी चालविणारे आरोपी मुद्देमालासह गजाआड

0
479

अवैध दारू विक्रेता व सट्टापट्टी चालविणारे आरोपी मुद्देमालासह गजाआड

चंद्रपूर : पोलीस स्टेशन दुर्गापूर परिसरात प्रोव्ही, जुगार, सट्टापट्टी, अवैध धंदे संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना मुखबिर च्या खबरेवरून परशुराम राजया गोटीपत्तीवार (४६) आदित्य अपार्टमेंट वार्ड नं. ३ दुर्गापूर येथे धाड टाकली असता त्याचे राहते बेडच्या खाली खरड्याच्या बॉक्समध्ये देशी दारू राकेट संत्रा कंपनीच्या ९० मिली च्या १०० नग अशा एकूण १४ बॉक्समध्ये १४०० नग बाटल्या ४२००० रुपयांचा मुद्देमाल व नगदी २८४५० रुपये असा एकूण ७०४५० रुपयांचा अवैध माल मिळाला.

तसेच अवैध सट्टापट्टी चालविणारे वॉर्ड क्रमांक ५ येथील रहिवासी ईश्वरसिंग मूलसिंग राजपूत (३६) व मूलसिंग उर्फ़ महाराज सौपालसिंग राजपूत (७५) यांच्याकडून दोन मोबाईल व नगदी १२१० रुपये असा एकूण ३७१० रुपयांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला.

दुर्गापूर हद्दीतील आशिष नथूजी खोब्रागडे (३०) यांच्याकडून देशी दारू राकेट संत्राच्या ९० मिलीच्या १०० नग बाटल्या ३००० किंमत रुपये व नगदी २७५० रुपये असा एकूण अवैध मुद्देमाल ५७५० रुपयांचा हस्तगत करण्यात आला.

सदरची कारवाई चंद्रपूरचे अपर पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत अपर पोलीस अधीक्षक वाचक शाखा चंद्रपूर येथील पोलीस कर्मचारी व पोलीस स्टेशन दुर्गापूर येथील पोलीस स्टाफसह छापा टाकून करण्यात आली असून आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here