महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर उपाध्यक्ष सचिन बावणेर यांच्या उपोषणाला यश…
प्रतिनिधी, देवेंद्र भोंडे
अमरावती : प्रभाग क्रमांक १७ गडगडेश्वर मधील जनतेच्या प्रश्नांसाठी मागील तीन दिवसानंपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर उपाध्यक्ष सचिन बावणेर हे उपोषणावर बसून होते.त्यामध्ये प्रभागातील नाल्याची स्वच्छता,कचरा गाड्या,रस्त्यावरील खड्डे,रखडलेले रस्ते,रस्त्यावरील पथदिवे,गटाराचे ब्लॉकेज व इतर समस्यांबाबतीत मागील सहा महिन्यांपासून वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा न काढल्याने उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आज दि ११.१२.२०२० रोजी सहाय्यक महानगरपालिका आयुक्त यांनी सर्व समस्यांबाबत लेखी पत्र देत आमरण उपोषण यशस्वी केले,प्रभागातील सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून,नागरीक मोठ्या प्रमाणात उपोषण मंडपाला भेटी देत होते.त्यावेकी आज मनपा सहाय्यक आयुक्त साहेब यांनी उपोषणाची दखल घेत आज स्वतः उपोषण मंडपात येऊन सचिन बावणेर यांना शरबत पाजून उपोषण सोडविले.त्यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ पाटील,महानगराध्यक्ष संतोष बद्रे,मनविसे विदर्भ अध्यक्ष भूषण फरतोडे,शहर अध्यक्ष गौरव बांते,मनविसे शहर अध्यक्ष,हर्षल ठाकरे,राजेश देशमुख,अजय महल्ले,धीरज तायडे,राजेश धोटे,राम कालमेघ,रावेल गिरी,राम पाटील,पवन निचत,बबलू आठवले, शैलेश सुर्यवंशी, सुरेश चव्हाण, रोशन शिंदे, सुरज बरडे,विवेक पवार,मनीष दीक्षित,निखिल बीजवे, गौरव बेलूरकर, राजेश देवडा,मयंक तंबूसकर,साकेत नखाते,तेजस कात्रे,प्रसन्न मार्कडे, सुरज भीडाने, शुभम गौर,अमित बीजवे,निलेश ताराळकर,विक्की थेटे,शुभम मातोडे, ऋतुज डायलकर, कुणाल चोपडे आदी उपस्थित होते…