छायाचित्रकारांचा दिनदर्शिका लोकार्पण सोहळा संपन्न

0
697

छायाचित्रकारांचा दिनदर्शिका लोकार्पण सोहळा संपन्न

 

राज जुनघरे

कोठारी :- छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर व बल्लारपूर तालुका छायाचित्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोठारी येथील महिपालसिंग बाबा टेकडी च्या निसर्ग रम्य सानिध्यात संस्थेच्या माध्यमातून व उपक्रमातून निर्मित दिनदर्शिका लोकार्पण सोहळा पार पडला.
या उपक्रम शिल कार्यक्रमाला प्रमुख विशेष अतिथी म्हणून छायाचित्रकारांचे प्रशिक्षक बंटी उर्फ नितिन मेश्राम परतवाडा, अमरावती यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अध्यक्ष स्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन रायपुरे, मार्गदर्शक सेवा निवृत्त मुख्याध्यापक वासुदेव खाडे, संस्थेचे उपाध्यक्ष रवी भगत, सचिव फुलचंद मेश्राम, आरोग्य परिवार विकास फाऊंडेशन चे श्याम शुक्ला, संस्थेचे विधी सल्लागार अॅडो. खुशाल खोब्रागडे, हेल्थ अँड वेल्थ अवेअरनेस चे विलास पेचे, बल्लारपूर तालुका संघटनेचे अध्यक्ष विवेक रामटेके, गडचिरोली जिल्हा समन्वयक शंकर चक्रवर्ती, बल्लारपूर पंचायत समिती उपसभापती सोमेश्वर पदमगिरीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्थेच्या कार्याची ओळख,दिशा, संस्थेचे बडकटीकरण, मैत्रिभावणा, या विषयावर उपस्थित मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले. छायाचित्रकारांच्या उत्थानासाठी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमरावती चे प्रशिक्षक नितिन मेश्राम यांनी मौलाचे मार्गदर्शन केले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी रूपेश कोठारे,मुल, दिलिप मांढरे पोंभुर्णा, देवा बावनकर नागभिड, अरून कुत्तरमारे गोंडपिपरी, नितिन मेंढे, राजु कार्लेकर, अमोल मेश्राम चंद्रपूर, आकाश कांबळे, कुणाल जावलीकर कोठारी, सुधिर बाला चामोर्शी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश रंगारी यानी केले, प्रास्ताविक फुलचंद मेश्राम तर आभार रविंद्र शिंदे नागभिड यांनी मानले. या सोहळ्याला जिल्हा भरातुन छायाचित्रकारांनी हजेरी लावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here