जयंती उत्सव समिती, विद्यानगर वार्ड जय भीम चौक बल्लारपूर तर्फे सम्राट अशोक जयंती मोठ्या उत्साहाने साजरी
रोहन कळसकर
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
बल्लारपूर- औद्योगिक श्रेत्र म्हणून ओळखले जाणाऱ्या बल्लारपूर शहरातील विद्यानगर वार्ड जय भीम चौक बल्लारपूर येथील जयंती उत्सव समिती तर्फे चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाचे आयोजन जयंती उत्सव समिती बल्लारपूर चे मुख्य संयोजक नागेश भाऊ रत्नपारखी, प्रशांत जी झामरे,प्रा.राजेश जी ब्राह्मणे, डॉ. विनय कवाडे सर, ॲड. विक्की आमटे, देशपाल सौदागर जयंती उत्सव समिती अध्यक्ष लक्ष्मण जी गोरघाटे , प्रविण थुल,मिथुन निमसटकार , गौतम हस्ते, ॲड. संदेश हस्ते, राजपाल जी सौदागर, देविदास करमरकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी प्रमुख्याने उपस्थित म्हणून dr अरुण, लांडे सर, सचिन मेश्राम भिम आर्मी बल्लारपूर चे बबलु करमरकर , महीला कांग्रेस कमिटी चे व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते तथा जयंती उत्सव समिती चे मार्गदर्शक ॲड. मेघाताई भाले व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि परिसरातील संपूर्ण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.