नांदा येथील प्रकार धान्याचा काळाबाजार नसताना बदनामीचा कट

0
445

नांदा येथील प्रकार धान्याचा काळाबाजार नसताना बदनामीचा कट

 

कोरपना प्रतिनिधी
कोरपना तालुक्यातील नांदा येथील रास्त भाव दुकान 1 वर्षापूर्वी संलग्नित करण्यात आले. त्याबाबत शिधापत्रिका धारकांच्या कोणतेही तक्रारी नसून सुरळीतपणे धान्य वितरण होत असताना राजकीय स्वार्थासाठी उठाठेव करणारी व्यक्ती इतर दुकानदाराला दुकान जोडण्याचे आमिष दाखवून या भागात थैमान घातला आहे. त्यामुळे दुकान काढणे व देणे हा प्रकार प्रशासना ऐवजी हा नेताच करू लागल्याने दुकानदारा मध्ये मोठी नाराजी पसरली आहे. राजकीय दबावतंत्राचा वापर करून तहसिलदारामार्फत अशा कारवाया होत असल्याने या भागातील दुकानदार मध्ये नाराजी पसरली आहे.

आदर्श महिला परिवार बचत संघ नांदा येथील शिधापत्रिका धारकांना नियमित धान्य देत आहे. जानेवारी महिन्याचे मोफत धान्य वितरण आम्ही केले नसताना आसन येथील राऊत यांनी वितरण केले असताना आमच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे व निराधार आहेत तसेच विकास नुसतं कर हे सिद्धा पत्रिका धारक यांना धान्य मंजूर झाले नाही अथवा यांचा शिधापत्रिका यादीमध्ये नावाचा समावेश नाही असे असताना जानेवारी डिसेंबर मध्ये धान्य दिले नसल्याचा आरोप बिनबुडाचा आहे त्यांच्या नावाने धान्य मंजूर नाही त्यामुळे वाटप करण्याचा किंवा गैरवापर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तसेच जानेवारी महिन्यामध्ये मोफत धान्य वितरण आम्ही केले नाही असे असताना केलेले आरोप व 14 जानेवारी पूर्वी कंट्रोल गोडाऊन वरून वाटपाचे धान्य आले नाही तर बिल काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही राऊत यांनीच मोफत धान्याचे वितरण केले असल्यामुळे वर्तमानपत्रात दिलेली बातमी निराधार व बदनामी करणारी असल्याचे शालू धोटे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here