लेखणी महिला मंडळ तर्फे क्रांत्रिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन तसेच महिला दिन साजरा

0
555

लेखणी महिला मंडळ तर्फे क्रांत्रिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन तसेच महिला दिन साजरा

(प्रा.महेंद्र बेताल प्रतिनिधी)
दि.10/03/2021 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका. चिमुकल्या मुलींनी आपल्या कवितेतून क्रांतीज्योती सावित्रीबाई यांना अभिवादन केले .
*लेखणी महिला मंडळ* तर्फे महिला दिन साजरा करण्यात आला. सौ शोभा गायकवाड यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले.
लेखणी महिला मंडळातर्फे कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव असतांनाही डॉक्टर व परिचारिका यांनी घेतलेले परिश्रमाची जाण ठेऊन डॉ ज्योती डांगे, नागरी आरोग्य केंद्र वस्ती विभाग नगर परिषद बल्लारपूर आणि त्यांच्या परिचारिका असे एकूण २१ जणांना शाल व गुलाबाचे पुष्ष देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतांनी झाली
मंडळाच्या सचिव सौ स्वाती विशाल मुन यांनी प्रास्ताविकेतून मंडळाच्या उद्देश व महिला दिनाचे महत्व पटवून सांगितले .
सौ प्रकृती पाटील (गायकवाड मॅडम) यांनी समुदायाला स्त्री किती महान आहे ह्याबद्दल मागदर्शन केले.
डॉ ज्योती डांगे ह्यांनी स्त्रियांच्या आरोग्याबद्दलची माहिती दिली .
अध्यक्षीय भाषणात सौ शोभा गायकवाड यांनी पुरुषाप्रमाणे स्त्रियांचेही वर्चस्व कसे ते सांगितले. स्त्री ही शिक्षण घेऊन काय काय करू शकते ह्याची उदाहरणे देऊन सर्वांची मने जिंकून घेतली .
सूत्र संचालन मंडळाच्या उपाध्यक्षा सौ सोनाली घडसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. राणी शंभरकर यांनी केले .
संस्थेच्या सभासद सौ सीमा डंभारे, सौ दीक्षा गायकवाड ,सौ योगिता धोपटे ,सौ अनुसया धोपटे, सौ प्रज्ञा गायकवाड, सौ छाया वाघमारे, सौ नीलम वाघमारे सौ विमल मेश्राम , सौ छाया फुलझेले आदींनी परिश्रम घेतले. तसेच लेखणी महिला मंडळाच्या सर्व सभासद व शहरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here