जिद्दीला कष्टाची साथ दिल्यास यश निश्चित

0
394

जिद्दीला कष्टाची साथ दिल्यास यश निश्चित

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार ; चुनाळा ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

 

 

राजुरा : ग्रामीण भागात राहून कठीण परिस्थितीवर मात करीत यश प्राप्त करणाऱ्या चुनाळा येथील विद्यार्थ्यांना ग्राम पंचायतीच्या वतीने बुधवारला (दि. २९) इंदिरा गांधी सभागृह येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून स्पर्धेत टिकायचे असल्यास योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे चुकीचा निर्णय घेतल्यास स्पर्धेबाहेर पडावे लागतील, तेव्हा मनात जिद्द, चिकाटी व मेहणत करण्याची हिंमत ठेवा, जिद्दीला कष्टाची साथ दिल्यास यश निश्चित असल्याचे मत व्यक्त केले.

चुनाळा ग्राम पंचायतीच्या वतीने इंदिरा गांधी सभागृह चुनाळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार सुदृशन निमकर, मुख्य अतिथी जिल्हा परिषद चंद्रपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, प्रमुख पाहुणे उपविभागीय वनधिकारी अमोल गर्कल, संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, गटशिक्षणाधिकारी मनोज गौरकार, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, मुख्याध्यापक विठ्ठलराव बोबडे, साईबाबा इंदूरवार, संतोष अक्कु, सरपंच बाळनाथ वडस्कर, पोलीस पाटील रमेश निमकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप मैसने, माजी सरपंच संजय पावडे, शंकर ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर कोमटी, शंकर पेद्दूरवार, ग्राम पंचायत सदस्य उषा करमनकर, राकेश कार्लेकर, राजू कीनेकर, रवींद्र गायकवाड, कोमल काटम उपस्थित होते.

यावेळी शिवाजी हायस्कुल चुनाळा येथील विद्यार्थिनी वडिलांचे छत्र हरवलेली काजल विठ्ठल डोंगरे या विद्यार्थिनीने ९४ टक्के घेत तालुक्यातून दुसरा क्रमांक पटकाविला तर शिवानी गजेंद्र मिश्रा (८९.८०), प्रिती दिवाकर खाडे (८६.८०), साक्षी शंकर तपासे (७८%), देवकी भाऊराव लांडे (७७%) या गुणवंत विद्यार्थिनींचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. यावेळी मज8 आमदार सुदर्शन निमकर यांनी सांगितले की, ग्राम पंचायतीने सत्कार समारंभाचा घेतलेला कार्यक्रम कौतुकास्पद असून आपल्या गावातील मुलींचा आपण अभिमानाने सत्कार करून त्यांना प्रोत्सान देने आवश्यक आहे, गरीब परिस्थितीतून आपल्या मुलांना शिक्षण देताना आई-वडिलांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते मात्र मुलं प्रविण्यासह यश संपादित करते त्यावेळी पालकांच्या मनात वेगळाच आनंद होत असल्याचे सांगितले. यावेळी उपविभागीय वनाधिकारी व संवर्ग विकास अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन गजानन दातरवार आभार उषा करमनकर यांनी केले यावेळी शिवाजी हायस्कुल, जिल्हा परिषद मराठी, तेलगू शाळा चुनाळा, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here