मनपातील निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई

0
416

मनपातील निविदा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई

आम आदमी पार्टीने उघडकीस आणलेल्या मनपातील 1 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत ; मात्र स्वयंस्पष्ट चौकशी अहवाल पाठविन्यास टाळाटाळ

 

चंद्रपूर : मनपातील 1 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. समितीचा अहवाल प्राप्त झाला परंतु अजून पर्यंत माननीय जिल्हाधिकारी यांनी स्वयंस्पष्ट स्पष्टीकरण विभागीय आयुक्त यांना वारंवार मागणी करून सुद्धा अजून पर्यंत पाठविले नाही. आता मा.जिल्हाधिकारी कडून परत अहवाल मनपा कडून मागविण्यात येत आहे .मग चौकशी समिती नेमन्याचे औचित्य काय अनेक महिने उलटूनही जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीसाठी वेळ काढू धोरन अवलंबून दिरंगाई होत आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे यांनी केला आहे.

महापौर यांच्या प्रभागातील वडगाव येथे पूर्वीच बांधकाम झालेल्या कामाची निविदा काढून पुन्हा गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील या संशयास्पद निविदेच्या चौकशी करण्यासाठी आदमी पार्टीने विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.

महानगरपालिका हद्दीतील वडगाव प्रभाग व भानापेठ प्रभाग येथील कॉक्रीट रस्ते, नाल्या, कंपाउंड वाल, पेव्हींग ब्लॉकचे काम, फर्नीचर व पेंटींगचे काम आदी कामांची नविन निविदा १० जानेवारी २०२२ ला काढण्यात आली. तशी रीतसर निविदा जाहीरात वृत्तपत्राला देण्यात आली. सदर कामे ही जवळपास करोड रुपयांची आहे. या कामांसाठी कंत्राट दारांकडून निविदा मागविण्यात आल्या. मात्र वास्तविक ही सर्व कामे याअगोदरच झालेली आहेत. तरी या कामांची नविन निविदा जाहीरात काढून महानगरपालिकेने उघड उघड भ्रष्टाचाराचा घाट घालून जनतेच्या करातून गोळा केलेले एक करोड रुपये खिशात घालण्याचा प्रताप सुरु केला आहे.

या निविदा जाहीरातीची व सदर कामांची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केली होती. त्यानुसार नगरपरिषद प्रशासनाचे प्रादेशिक आयुक्त संघमित्रा डोके यांनी
या प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसाच्या आत अहवाल व आणि अभिप्राय सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

उपरोक्त प्रकरणाचे अनुषंगाने समितीने आदेशाचे दिनांकापासून 5 दिवसांत मौका चौकशी करून सविस्तर चौकशी अहवाल आपले अभिप्रायासह या कार्यालयास सादर करावे , असे सूचित करण्यात आले होते. मात्र, 3 महिने उलटूनही चौकशी झाली नाही.

ही चौकशी झाली असती तर सत्ताधारी भाजप आणि पालिका अधिकाऱ्यानी केलेल्या मिलीभगत भ्रष्टाचाराचे पितळ उघडे झाले असते, म्हणून जिल्हाधिकारी यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे अध्यक्ष सुनील मुसळे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here