बुध्द भुमिला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी…

0
596

बुध्द भुमिला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी…
आजी-माजी लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची गरज!

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

गडचांदूर/कोरपना : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील गडचांदूर जवळील निसर्गरम्य भागातील पर्यटकाच्या आवडीचा बुध्दभुमी ला पर्यटनस्थळ म्हणून विकासित अन् पर्यटनाच्या दर्जा द्या! अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया च्या वतीने रिपाइंच्या कोरपना अध्यक्षा शिला गौतम धोटे यांनी पालकमंत्री यांच्या कडे केली आहे.येथील पावसाळ्यात आणी हिवाळ्यासह उन्हाळ्यात या गडचांदूर नजिकच्या अमलनाला सिंचन प्रकल्पाच्या अगदी शेजारी असलेल्या बुध्दभुमितील पर्यटकांची व बौध्दबांधवाची मोठी बारमाही गर्दी उसळत असते मात्र येथे सोयी सुविधांचा अभाव दिसून येतो. या बुद्धभुमीला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करायला हरकत नाही. या बुध्दभुमिच्या पर्यटकांकरिता मागील गेल्या विस वर्षापासून येथील बुध्दभुमिच्या पर्यटन स्थळाची मागणी येथील बौध्द अनुयायी मागणी धरून आहेत. येथील गेल्या कित्येक दिवसापासून बुद्धभुमितील बुध्द मूर्ती सह पाच बुध्द विहार आदीची सजावट, येथील कोरीव बुद्ध मुर्ती, अशोक चक्र आदीची सजावट आहे. या बुद्ध भुमिला अभिवादन करण्याकरिता केवळ चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर यवतमाळ, नागपूर, आंध्रप्रदेश, केरळ यासह राज्य तसेच देशातील बौद्ध बांधव व आबेडकर अनुयायी, राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रचारक व प्रेमी या गडचांदूर नगरीत अभिवादना करीता येत आहेत. या बुध्दभुमिला आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा दर्जा देण्यात यावा, येथील आंबेडकरी जनतेला भावनिक ठेवून येथील बुध्दभुमिचा विकास केला नसल्याने येथील आंबेडकरी जनतेच्या भावना दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप होत आहे.
सदर बुद्धभुमिच्या वेअरचे सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी येथील आंबेडकरी जनतेची आहे. सदर मागणी कडे लक्ष लोकप्रतिनिधीनी न दिल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोरपना तालुका अध्यक्षा शिला धोटे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here