अमरावती मतदार संघातील केंद्रिय मार्ग निधी अंतर्गत कामांना मिळाली गती

0
388

अमरावती मतदार संघातील केंद्रिय मार्ग निधी अंतर्गत कामांना मिळाली गती

आ. सुलभाताई खोडके यांनी खेचून आणला २४ कोटी ८७ लाखांचा निधी

सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचे आभार मानीत केले अभिनंदन

प्रतिनिधी देवेंद्र भोंडे

अमरावती २८ ऑक्टोबर : सद्या कोरोना कितीही गंभीर असला तरी अमरावतीचा कायापालट करण्यासाठी आ सुलभाताई खोडके खंबीर आहेत. अमरावतीत विकासाचे नवे पर्व नांदण्यासाठी आ. सुलभाताईनी रखडलेल्या व अर्धवट कामांना गती देण्यावर भर दिला असून आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून पर्याप्त निधी खेचून आणला आहे. अमरावती मध्ये गेल्या चार वर्षांपासून केंद्रीय मार्ग निधि अंतर्गत विविध रस्ता काँक्रिटीकरणाचे कामे सुरू आहे. मात्र निधि अभावी ही कामे संथगतीने सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून अवागमन करतांना नागरिकांना अत्यंत अडचणी निर्माण होत आहे. तसेच सुरक्षित वाहतुकीलाही प्रचंड कोंडी होत आहे. या संदर्भात आ. सुलभाताई खोडके यांनी आढावा घेतला असता निधि अभावी कंत्राटदार काम पुढे नेत नसल्याचे समोर आले. सदर बाब अत्यंत गंभीरतेने घेऊन आ.सुलभाताई खोडके यांनी राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना पत्र देऊन केंद्रीय मार्ग निधि अंतर्गत अमरावतीमतदार संघात सुरू असलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामांसाठी निधि उपलब्ध करण्याची विनती पूर्वक मागणी केली . ज्यामधे अमरावती – कठोरा या प्रमुख जिल्हा मार्गावरील व्हीएमव्ही ,कठोरा नाका , रिंग रोड रस्त्याकरिता ११ कोटी , अमरावती- बडनेरा राज्य मार्गावरील मालवीय चौक ,जयस्तंभ चौक , राजकमल चौक येथील रस्ता काँक्रिटीकरणांकरिता १४ कोटी , तसेच अमरावती -चांदूर रेल्वे रस्ता राज्य मार्गावरील अमरावती बसस्थानक , मालटेकडी , चपराशी पुरा वडाळी , एसआरपीएफ वसाहत मार्ग कामाकरिता ४ कोटी ७६ लाख, तर अमरावती – अचलपूर या प्रमुख राज्य मार्गावरील चित्रा चौक ते नागपुरी गेट रस्त्याचे उड्डाणपुलाचे बांधकामाकरिता ३ कोटी ७० लाख अश्या एकूण ३३ कोटी ४६ लाख ८४ हजार ईतक्या निधीची आवश्यकता असल्याचे आमदार महोदयांनी पत्राद्वारे मंत्री महोदयांना सांगितले. या मागणीच्या अनुषंगाने सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी अमरावती मतदार संघात केंद्रीय मार्ग निधि अंतर्गत साकारत असलेल्या रस्त्यांकरिता २४. ८७ कोटींचा भरीव निधि उपलब्ध केला आहे . आ.सुलभताई खोडके यांनी निधीच्या उपलब्धतेला घेऊन सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत २४. ८७ कोटींचा निधि खेचून आणल्याने केंद्रीय मार्ग निधि अंतर्गतच्या रखडलेल्या रस्ता निर्मिती कामांनी वेग धरला आहे . सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी अमरावती मतदार संघातील रस्ता काँक्रिटीकरणासाठी उपलब्ध करून दिलेल्या २४ कोटी ८७ लाख या निधि अंतर्गत अमरावती – व्हीएमव्ही ,कठोरा नाका , रिंग रोड रस्त्याकरिता ५ कोटी ८६ लाख , अमरावती- बडनेरा राज्य मार्गावरील मालवीय चौक ,जयस्तंभ चौक , राजकमल चौक येथील रस्ता काँक्रिटीकरणांकरिता ११ कोटी ८४ लाख , तसेच अमरावती -चांदूर रेल्वे रस्ता राज्य मार्गावरील अमरावती बसस्थानक , मालटेकडी , चपराशीपुरा ,वडाळी ,एसआरपीएफ वसाहत मार्ग कामाकरिता ४ कोटी , तर अमरावती – अचलपूर या प्रमुख राज्य मार्गावरील चित्रा चौक ते नागपुरी गेट रस्त्याचे उड्डाणपुलाचे बांधकामाकरिता ३ कोटी १३ लाख इतका निधि सदर कामाकरिता वितरित करण्यात आला आहे. सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अमरावती मतदार संघातील रस्ता बांधकामांकरिता पर्याप्त निधि उपलब्ध करून दिल्या बद्दल आ. सौ सुलभाताई खोडके यांनी त्यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे. तसेच नामदार अशोकराव चव्हाण यांचे वाढदिवसाबद्दल शुभेछ्या देऊन अभिष्टचिंतन देखील केले आहे.

आ. सौ सुलभाताई खोडके द्वारे करण्यात आलेल्या विनंती पत्रातील मागणी लक्षात घेता नामदार अशोकराव चव्हाण यांनी उर्वरित निधी नजीकच्या काळात उपलब्ध करून देण्याला घेऊन सकारात्मकता दर्शवून आश्वस्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here