केंद्र सरकारच्या वाढत्या महागाई विरोधात गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनआक्रोश आंदोलन

0
555

केंद्र सरकारच्या वाढत्या महागाई विरोधात गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनआक्रोश आंदोलन

 राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चक्क चूल पेटवून थापल्या भाकरी

✍️  सुखसागर झाडे गडचिरोली:-

 

 

केंद्र शासनाच्या गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज शनिवार 3 जुलै रोजी राज्यव्यापी जन आक्रोश आंदोलन छेडण्यात आले. गडचिरोलीच्या गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार धर्मराव बाबा आत्राम व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व मोदी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करून निषेध नोंदविला.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम यांच्या नेतृत्वात महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून भाकरी थापल्या आणि गॅस व दुचाकी वाहनांना फुलांचा हार चढवून प्रतिकात्मक स्वरूपात गॅसला तिलांजली वाहिली.
दिवसेंदिवस गॅस व इंधनचे दरवाढ होत असून पेट्रोल-डिझेलच्या दराने तर उच्चांक गाठला आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोवऱ्यावर चूल पेटवून भाकरी थापून स्वयंपाक बनविले, आणि गॅस, इंधन दरवाढ व महागाई वारंवार भडका घेत असल्याने केंद्र शासनाच्या विरोधात निषेध नोंदवून संताप व्यक्त केला.
उल्लेखनीय म्हणजे गत आठ महिन्यांपासून वारंवार राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे गॅस, इंधन, पेट्रोल-डिझेल व केंद्र शासनाशी निगडित असलेल्या तत्सम जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी विरोधात चूल पेटवून आंदोलन छेडण्यात आले आहे.
केंद्र व मोदी सरकार तात्काळ गॅस व इंधनाचे दरवाढ कमी न केल्यास अजून मोठ्या स्वरूपात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला.
यावेळी रा.काँ. चे जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, मुख्य सचिव संजय कोचे, विभागीय सचिव सोनालीताई पुण्यपवार, सरचिटणीस जगण जांभुळकर, विधानसभा अध्यक्ष गोकुलदास ठाकरे,सेवा दल जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे,ओबीस जिल्हा अध्यक्ष विनायक झरकर, सा.न्याय विभाग महिला जिल्हा अध्यक्ष प्रेमिलाताई रामटेके,अल्पसंख्याक जि.मुस्ताक शेख, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, शहराअध्यक्ष विजय धकाते, कार्याअध्यक्ष कपिल बागडे, सा.न्याय उपाध्यक्ष इंद्रपाल गेडाम,महिला शहराअध्यक्षा मनीषाताई खेवले, सारिका गडपल्लीवार, ममता पटवर्धन,रेखा बारापात्रे, जितेंद्र मुप्पीडवार, अंकुश मामिडवार, पुरषोत्म सलामे, विठ्ठल निखूले,रुपेश ढोणे, प्रमोद गुंडावार,तुलाराम अंबादे,जुगणु पटवा,मलय्या कालवा, शंकर दिवटे,सविता चव्हाण, लता कोलते, अनिता कोलते, शैला कातकर,विद्या सिडाम,सुशिला मामिडवार, अर्चना नंदेश्वर,इंदिरा उराडे, रोशन राऊत, राजू पोटावर, रवींद्र चुधरी, मनहोर वाकडे, रवींद्र ठाकरे, विलास खेवले, रवींद्र डाखोरे,विनोद मानकर,निकेश जेंठे,अरुण नौताम,नामदेव मांडोरे,महेश शेडमाके,आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेगण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here