रेती तस्करी करतांना ट्रक्टरची दुचाकीस्वाराला धडक

0
385

रेती तस्करी करतांना ट्रक्टरची दुचाकीस्वाराला धडक

अपघात अपगंत्व आलेल्या बापलेकीची जबाबदारी कोण स्विकारणार ?

ट्रक्टर जप्त करुन चालक मालकावर तात्काळ कारवाई करा – रुपेश निमसरकार

 

पोंभूर्णा : तालुक्यात अवैध धंदे फोफावले असून गौण खनिज सह सुंगधीत तंबाखू चे मोठे रॅकेट सक्रीय असून संबधीत प्रशासन मुंग गिळून गप्प आहे की काय? असा सवाल ऑल इंडिया पँथर सेनेचे __ जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी उपस्थित केला आहे. आणि चोरटी रेती वाहतूक करतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक्टरने एका दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. त्यात चेकफुटाणा येथील बाप व मुलगी गंभीर जखमी झाले. ही बाब अंत्यत संतापजनक आहे. यात त्या दोघांचे हात पाय तुटले असून आयुष्यभराचे अपगंत्व आले आहे. त्यामुळे या घडलेल्या अपघातातील रेती चोरणारा ट्रक्टर मालक हा भाजपाचा मोठा पदाधिकारी म्हणजे चिंतलधाबा येथील रोशन ठेंगणे आहे. एवढा मोठा प्रसंग त्या अपघात ग्रस्त पिंडितावर आले असताना भाजपाचा रेती तस्कर ट्रक्टर मालक रोशन ठेंगणे त्या पिडीत कुटुंबाची थातुरमातुर व्यवस्था करतो तुम्ही पोलीस तक्रार देऊ नका असे म्हणून केवळ जबाबदारी झटकतो. आणि एवढे घडून सुद्धा पोलीस प्रशासन अजूनही त्याच्यावर कारवाई करीत नाही. या निंदनीय बाबीचा ऑल इंडिया पँथर सेना निषेध करीत असून तात्काळ त्या रेती चोर ट्रक्टर मालक रोषन ठेंगणे व चालक यांचेवर भांदवी गुन्हा दाखल करुन अवैध रेती तस्करी करण्यासंबंधी तात्काळ महसूल प्रशासनाला कळवावे अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना या अवैध तस्कराविरोधात पँथर स्टाईलने भुमिका घेईल. यात कायदा सुव्यवस्था बिघडल्यास याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत प्रशासनाची राहील असा इशारा पँथर सेना जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी दिला आहे.

पोंभूर्णा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैद्य धंधे सुरु आहेत. त्यात अवैद्य रेती चोरी, अवैद्य सुंगधीत तंबाखुची विक्री, आवैद्य दारु विक्री, अवैद्य रेशन मालाचा काळाबाजार, आदी बेकायदेशीर धंदे फोफावले आहेत. मात्र येथील तालुका न्याय दंडाधिकारी, पोलीस प्रशासन वा संबंधीत विभाग का गप्प आहे ? हा प्रश्न तालुक्यातील जाणकारात निर्माण झाला असून या प्रकरणाबाबत संबंधीत प्रशासनाची ठिकठिकाणी निंदा करतांना पहायला मिळते. कालच चिंतलधाबा येथील रेती चोरणारा ट्रक्टर अपघात घडताच ट्रक्टर मालक जाऊन भरलेल्या रेतीची वेळीच विल्हेवाट करतो आणि गाडीतील रेती अस्ताव्यस्त करतो ही बाब सुद्धा गुन्ह्यास पात्र आहे. असे असताना महसूल प्रशासन गाडीत रेती मिळाली नाही म्हणून कारवाई होत नाही असे म्हणत जबाबदारी झटकतो हा सुद्धा गुन्हा आहे, म्हणून त्या रेती तस्करी करणाऱ्या ट्रक्टर मध्ये अपघात झालेल्यांना फुस लाऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रक्टर मालक व चालक यांचेवर तात्काळ कारवाई करून पिडितांना न्याय द्यावा अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना खपवून घेणार नाही, येणाऱ्या काळात या मुद्याला घेऊन हल्ला बोल आंदोलन केल्या शिवाय सोडणार नाही, असे मत जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी माध्यमाशी बोलताना दिल आहे. या आंदोलना दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडल्यास संपूर्ण जबाबदारी सुद्धा संबंधीत प्रशासनाची असेल. असेही स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here