बोगस सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर तत्काळ कारवाई करण्यात यावी : आ. डॉ देवराव होळी

0
470

बोगस सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर तत्काळ कारवाई करण्यात यावी : आ. डॉ देवराव होळी

संबधित अभियंता व एजन्सी वर गुन्हे दाखल करण्यात यावे

सुखसागर झाडे । नगर पंचायत चामोर्शी अंतर्गत सन २०२० मध्ये बांधकाम करण्यात आलेले सी.सी. रोड बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे त्यापैकी प्रभाग क्र. १३ चे साधुबाबा कुटीजवळील मधुकर गौरकार ते विनोद गुडलावार यांच्या घरापर्यंतचे सी.सी. रोड व नाली बांधकाम कींमत ३२,३५९२६/- रु. हे काम त्यापैकीच ८ ते १० महीण्यातच ह्या रोडला भेगा पडल्या व साईडला लावलेले गट्टु खाली दबले आहे ,आज या रस्त्याची तक्रार आमदार डॉ देवराव होळी यांच्या कडे प्राप्त झाल्यानंतर आमदार डॉ होळी यांनी तत्काळ तक्रारीची दखल घेतली व प्रत्यक्ष या रस्ता बांधकामाची पाहणी केली. यावेळी रस्त्यावर अनेक ठिकाणी जागोजागी भेगा पडलेल्या अवस्थेत व रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेले गट्टू दबलेले होते.
या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल आमदार डॉ होळी यांनी नाराजी व्यक्त केली. व या निकृष्ट दर्जाच्या कामाची मा, जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी सखोल चौकशी करुन चामोर्शी येथे बांधकामात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करुन भ्रष्टाचारी कञांटदार व चिरीमिरी अभियंता यांच्यावर दंडात्मक कारवाही करुन फौजदारी गुन्हे दाखल करावे. अशी मागणी आमदार डॉ देवराव होळी यांनी केली यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे युवा मोर्चा नेते प्रतीक राठी येथील रहिवासी निवासी शिक्षक संजय लोणारे, शिक्षक राजू धोडरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here