बालविवाह प्रतिबंध आणि बालकांवरील अत्याचारावर आळा घाला – विद्या पाल

0
452

बालविवाह प्रतिबंध आणि बालकांवरील अत्याचारावर आळा घाला – विद्या पाल

पोंभूर्णा :-

एकाविसवे शकतं लागेल असून देखील आजही बालविवाह सुरूच आहे. ही समाजाला लागलेली किळ आहे. समजात अश्या प्रकारची कृत्य होणे म्हणजे समाजाला वाईट चालीरीती कडे ढकलणे होय. तसेच लहान वयात बालकांना पैसा आभवी कामाला लावणे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे. त्यांना मोल – मजुरी करण्यास भाग पाडणे. त्याचा वर नाना प्रकारचे अत्याचार करणे. हे आज घडीला कुठे तरी थांबले पाहिजे. त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना शिक्षणाचा प्रवाहात आणले पाहिजे. त्यामुळे त्यांचे भविष्य उज्वल होणार आणि ते पक्षा प्रमाणे आपल्या आयुष्यात देखील उंच भरारी घेतली असे प्रतिपादन चक फुटाना येथील बालविवाह कार्यशाळे दरम्यान करण्यात आले.

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत 42 ग्राम पंचातीमध्ये “बालविवाह प्रतिबंध” व ” बेटी बचाओ बेटी पढाओ” या अभियाना द्वारे गावातील नागरिकांना जाणीव जागृती केली जात आहेत. त्याच अनुषंगाने चक फुटाना येथे कार्यशाळा घेण्यात आली.

बालविवाह कायदा 2006 व ग्राम बाल संरक्षण समिती मध्ये कोण कोण असतात व त्यांची समाजाविषयी ची जबाबदारी काय आहे याबाबत सविस्तर माहिती देवून बालविवाह या विषयावर चित्रफिती दाखवण्यात आली. तसेच मुलांना घरात आणि समाजात शिक्षण सुरक्षा, सन्मान, समावेश व सरंक्षण मिळावे यासाठी पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. कोरोनामुळे मूले घरीच असल्याने त्यांना घरच्या घरी शिकवणी सुरू करून त्यांचे कला गुणांना वाव द्यावा याबाबत विडिओ दाखविण्यात आले. तसेच 1098 हा चाईल्ड हेल्पलाईन नंबर बद्दल सर्वांना माहीती दिली. बालकांचे हक्क व अधिकाराबाबत माहिती देऊन बालकांच्या समस्येवर चर्चा करण्यात आली.

यावेळी मागील 10 वर्षात एकही बालविवाह झालेला नाही व बाल विवाह होणार सुद्धा नाही अशी शपथ घेण्यात आली.कार्यक्रमा प्रसंगी मा.सरपंच तुळशीराम जी रोहनकर यांच्या हस्ते मास्क आणि डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला गावचे सरपंच तुळशीराम जी रोहनकर, महाराष्ट्र ग्राम सामजिक परिवर्तन अभियानाचा जिल्हा समन्वयक विद्या पाल , धर्मेंद्र घरत ग्रामपरिवर्तक, हिराचंद रोहनकर ग्रामपरिवर्तक ,ब्लॉक समन्वयक विशाल पावडे,क्षेत्र सहाय्यक कैलास कक्कलवर,आरोग्य सेविका शेडमाके मॅडम,CTC कोमल बिस्वास, अंगणवाडी सेविका माधुरिताई बोंमावर, मदतनीस कानमपल्लीवर, राजूभाऊ अर्जुनकर तसेच किशोरवयीन मुले मुली,पालक वर्ग यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सोशल डिस्टन्सस्टिंग चे तंतोतंत पालन करून व पोषक आहार देऊन पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here