जळगाव येथील अमळनेर दहिवद येथे जि.प. सदस्य जयश्रीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखालील वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

0
335

आनंदवन( मियावाकी) ही एक थोड्या जागेत जास्तीतजास्त झाडे लावून घनदाट अरण्य तयार करण्याची संकल्पना असून त्या अंतर्गत दहिवद गावांत वृक्षारोपण करण्यात आले .या संकल्पनेला प्रत्यक्षात जमिनीवर उतरवण्याचे काम दहिवद गावांतील वृक्षमित्र पंकज पाटील यांनी केले यापुर्वी देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो झाडे लावण्यात आली आहेत व ती सर्व झाडे जगवण्याचा विक्रम दहिवद गावाने केला आहे .त्यामुळे तालुक्यातील पर्यावरण पुरक गांव म्हणून दहिवद गांव नावारूपाला येत आहे.

आनंदवन ही संकल्पना प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यासाठी ग्रामनिधींचा वापर करण्यात आला. दहिवद गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसले, उपसरपंच वैशालीताई माळी व फिल्डवर काम करणारे शिवाजी पारधी ,ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रत्यक्ष मेहनत घेतली .कायदेशीर बाबी व मार्गदर्शन ग्रामविकास अधिकारी संजीव सैंदाणे यांनी केले.

आनंदवन ही संकल्पना दहिवद गांवी प्रत्यक्ष उतरावी यासाठी अमळनेरचे लोकप्रिय गटविकास अधिकारी यांनी वृक्ष मित्र पंकज पाटील यांच्याशी चर्चा केली होती .ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी सातत्याने पंकज पाटील यांच्याशी संपर्क करत कामाचे नियोजन केले.

ग्रामपंचायत दहिवद येथे गटविकास अधिकारी यांनी मिटिंग घेवून लोकनियुक्त सरपंच यांना मार्गदर्शन केले.त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पारधी यांनी कामाची दुरा हातात घेवुन काम पूर्णत्वास नेले .

या कार्यक्रम प्रसंगी विस्तार अधिकारी सुधीर पाटील ,गावांतील मान्यवर,ग्रामपंचायत सदस्य , माजी जि. प सदस्य अशोक आबा, माजी सभापती सुभाष देसले ,भाजपा सरचिटणीस हिरालाल पाटील ,सामाजिक कार्यकर्ते गोकुळ माळी ,किशोर जाधव ,सुनिल धनगर या दहिवद विकास मंच सदस्यांची उपस्थिती होती.

जळगाव जिल्हा प्रतिनिधी विशाल सुरवाडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here