आयटकचे सास्ती उपक्षेत्रीय कार्यालयापुढे धरणे

318

आयटकचे सास्ती उपक्षेत्रीय कार्यालयापुढे धरणे

 

राजुरा – वेकोलि कामगारांच्या अनेक महत्वपूर्ण मागण्यांची व्यवस्थापनाने पूर्तता करावी, या मागण्यांसाठी तीन दिवस सास्ती खाण कर्यालयापुढे गेट मीटिंग करीत आंदोलन केल्यानंतर खाण कामगारांनी सास्ती उपक्षेत्रिय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. न्याय मागण्या तातडीने मंजूर कराव्या, अशी या कामगारांची मागणी होती. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनाचे नेतृत्व संयुक्त खदान मजदुर संघाचे अध्यक्ष सिरपुरम रामलू, क्षेत्रीय सचिव दिलीप कनकुलवार,रायलिंगु झुपाका, उल्हास खुणे, प्रेमानंद भद्रय्या पाटील, नातारकी, विलास भोयर, रवि डाहूले, सातूर तिरूपती, गंगाधर बोबडे, विनोद डेरकर, चेतन पावडे इत्यादी नेत्यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले. सास्ती भूमिगत खाणीतून धोपटाळा ओपनकास्ट माइनमध्ये तात्पुरते काम करण्यासाठी नेमणूक केलेल्या कामगारांना एक दीड वर्ष उलटूनही अद्याप बुधवार सुट्टीचे द्वीवेतन तातडीने सुरू करावे, सास्ती उपक्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे वैद्यकीय व प्रवास बिल त्वरित मिळावे, सास्ती टाउनशिप येथील मल निस्सारणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, नवीन धोपटाळा खाणीत रुग्णवाहिका आणि मनुष्यबळ बसेसची तसेच आरओ शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी, उपक्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांचे सी.एम.पी.एफ. पासबुक मार्च २०२१-२२ पर्यंत अपडेट करून दाखवावे, सास्ती ते धोपटाळा चेकपोस्ट पर्यंत पक्का रस्ता, सुरक्षित विश्रांती निवारा स्थळ निर्माण करावे आणि आयटीआय धारकास तांत्रिक काम द्यावे इत्यादी मागण्या संघटनेने केल्या आहेत. यापूर्वी चर्चेत व्यवस्थापनाने या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यावर अमलबजावणी केली नसल्याचा आरोप यावेळी कामगार नेत्यांनी केला.

advt