तीन राज्यातील अभुतपूर्व विजयाचा घुग्घुस शहरात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

0
306

तीन राज्यातील अभुतपूर्व विजयाचा घुग्घुस शहरात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

 

घुग्घुस येथे भाजपातर्फे रविवार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी तीन राज्यातील विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले व भाजपाने घवघवीत विजय संपादित केला.त्याअनुषंगाने ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व भाजयूमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या नेतृत्वात तीन राज्याच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

याप्रसंगी भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळासमोर मेणबत्ती प्रज्वलन करून व माल्यार्पण करून अभिवादन करून शहरात ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. जुना बसस्थानक, गांधी चौक, आठवडी बाजार मार्गे मार्गक्रमण करीत नवीन बसस्थानक चौकात मिरवणूक समाप्त करण्यात आली. ठिकठिकाणी फटाके फोडून व फाटक्याची आतिशबाजी करून लाडू वाटप करण्यात आले.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे,भाजपाचे संतोष नुने,सिनू इसारप, साजन गोहणे, विनोद चौधरी, चिन्नाजी नलभोगा, बबलू सातपुते, रत्नेश सिंग,विवेक (गुड्डू) तिवारी,नितीन काळे, विनोद जंजर्ला, गणेश कुटेमाटे, सतीश बोंडे,सुरेंद्र भोंगळे, सचिन कोंडावार, मानस सिंग, सुरेंद्र जोगी, ललित होकम, विशाल नागपुरे, अंकेश मडावी, सागर तांड्रा, रामस्वामी पुनम, आकाश निब्रड, दिनेश बांगडे, आरिफ शेख, श्रीकांत बहादूर, विक्की सारसर, गौरव ठाकरे, अमीना बेगम, सुनंदा लिहीतकर व मोठया संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here