मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार पण…

0
1074

मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार पण…

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

 

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे : मुख्यमंत्रीपद सोडायला तयार पण…बहुमत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. तत्पुर्वी एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात 34 आमदारांच्या सह्या होत्या. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतामध्ये आलं होते.

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. बहुमत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. पण मला उद्धव ठाकरे नको, असे बंडखोर आमदारांपैकी कोणी सांगायला हवे, असे ते म्हणाले. तत्पुर्वी एकनाश शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात 34 आमदारांच्या सह्या होत्या. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतामध्ये आलं आहे.

सरकार अल्पमतात, शिंदेंचे पत्रावर 55 पैकी 34 आमदारांच्या सह्या
…हा आरोप अर्धसत्य

आधी प्रशासनाचा अनुभव नसतांना मी मुख्यमंत्रीपद सांभाळले. त्याचवेळी कोरोना आला. त्याकाळात उल्लेखनीय कामे केली. त्याची दखल घेतली गेली आणि पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले. माझ्यावर एक आरोप होत आहे की, मुख्यमंत्री भेटत नव्हते. हे गेल्या काही दिवसांपुर्वी बरोबर होते. परंतु त्यानंतर मी भेटायला सुरु केेली. त्यावेळेस मी भेटत नसतांना कामे कधी थांंबली नव्हती.

हिंदूत्व शिवसेना सोडले नाही

शिवसेना कोणाची आहे? काही जण म्हणतात, ही शिवसेना बाळासाहेबांची नाही. बाळासाहेब गेल्यानंतर 2014 साली मी स्वत:च्या ताकदीवर 63 आमदार निवडून आले. काही जण बाळासाहेबांच्या शिवसेनेनंतर मंत्री झाले. तेव्हा त्यांना वाटली नाही का? ही शिवसेना ती नाही.

मला धक्का का बसला

काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाले की, उद्धव ठाकरे नको, तर मला वाईट वाटले नसते. परंतु माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मी काय करायचे? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारत सांगितले की, माझ्यासमोर कोणीच बोलत नाही. उगीच सुरत किंवा इतर ठिकाणी जाऊन बोलतात. माझ्यासमोर बोलले तर मी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईल. मी माझा मुक्काम आजपासून वर्षावरुन मातोश्रीवर हलवत आहे.

आमदारांनी राजभवनावर जावे

जे आमदार गायब झाले आहे, त्यांनी यावे आणि माझा राजीनामा पत्र घेऊन राजभवनावर जावे. मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला त्यातही आनंद आहे.

पक्षप्रमुखपद सोडेल

शिवसैनिकांनी सांगावे मी पक्षप्रमुखपद सोडेल. फक्त शिवसैनिकाने समोर येऊन सांगावे.

फोन करा आणि बोला…

शेवटी उद्धव ठाकरे यांनी फुट टाळण्यासाठी आपल्या भाषणाचा माध्यमातून बंडखोरांना सांगितले की, तुम्ही माझे फेसबुक पाहिले असेल. आता फोन करा आणि सांगा की मी नको, तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईल. पण यापेक्षा अधिक काय सांगू.

एकदा ठरवू या समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असे ठेवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here