दोषी असेल तर कायदेशीर कारवाही करा,मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला ! प्रशांत टेकाम यांचा संतप्त प्रश्न.

0
902

दोषी असेल तर कायदेशीर कारवाही करा,मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला प्रशांत टेकाम यांचा संतप्त प्रश्न.

 

 झरी तालुक्यातील गर्भवती वाघीण मृत्यू प्रकरण

 

 अधिकारी कर्मचारी यांनी निरपराध महिलांना बेदम मारहाण केल्या प्रकरणी यांची चौकशी करूण ऑट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करा.

 

Impact 24 news

तालुका प्रतिनिधी /पुरुषोत्तम गेडाम 

यवतमाळ / झरी जामणी:- झरी तालुक्यातील मांगुर्ला जंगल पारिसरात गर्भवती वाघिणीच्या हत्येप्रकरणी शनिवारी १९ जून रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास पोलीस व वनविभागाचे पथकाने वरपोड येथून 5 आरोपींना अटक केली होती.या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना निरपराध व्यक्तींना विनाकारण गोवल्याचा,तसेच अटक करतेवेळी कर्मचा-यांनी गावक-यांना मारहाण केल्याचा आरोप करत शेकडो वरपोड येथील नागरिकांनी मुकुटबन पोलीस स्टेशनवर धडक दिली.या प्रकरणाची सखोल चौकशी करून मारहाण करणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर ऍट्रोसिटी दाखल करावी अशी मागणी करण्यात आली.

 

झरी तालुक्यातील मांगुर्ला जंगल परिसरातील गर्भवती वाघिणीच्या हत्येप्रकरणी व सोनेगाव जवळील वाघिणीच्या हत्ये प्रकरणी संयुक्त पथकाने शनिवारी १९ जून रोजी पहाटेच्या सुमारास वरपोड व येसापूर येथे कोम्बिंग ऑपरेशन केले होते.पहाटे ५ वाजताच्या सुमारास संयुक्त पथक वरपोड येथे दाखल झाले होते.वरपोड येथून ५ आरोपींना अटक केली. अटक करतेवेळी वनविभागाच्या कर्मचा-यांनी गावातील इतर लोकांनाही मारहाण केली तसेच अश्लिल शिविगाळ केली,असा आरोप गावक-यांकडून करण्यात आला आहे.मारहाणीत गर्भवती महीलाला सुध्दा मारहान झाली अश्या एकून १० माहिलाला त्या ठिकाणी मारहान झाली. कायदेशीर कारवाही करण्याचा अधिकार आहे पण कारवाहीच्या नावाखाली महीलाना मारहान करण्याचा अधिकार कुणी दिला असा प्रश्न या ठिकाणी प्रशांत टेकाम यांनी उपस्थित केला आहे.

 

मांगुर्ला व सोनेगाव येथील वाघाच्या हत्येप्रकरणी गावक-यांचा कोणताही संबंध नसून त्यांना विनाकारण गोवण्यात येत असल्याचा आरोप गावक-यांचा आहे.तसेच निरपराध लोकांना मारहाण करण्यात आल्याचाही त्यांचा आरोप आहे.वनविभागाच्या अशा गैर कायदेशिर कारवाहीमुळे आदिवासी समाजावर अन्याय झाला असून मानवी हक्का व अधिकार पायदळी तुळवण्याचा प्रकार झाला आहे अश्या सबंधित अधिकारी व कर्मचा-यांवर ऍट्रोसिटी अॅक्ट अनुसार कारवाही का करण्यात येउ नये अशी मागणी यावेळी वरपोड येथील नागरीकानी केली आह. या प्रकरणी त्यांनी लेखी तक्रार जिल्हा अधिकारी यवतमाळ,जिल्हा पोलिस अधिकारी यवतमाळ,आदिवासी हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र,प्रकल्प अधिकारी पांढरकवडा,मानवी हक्क आयोग महाराष्ट्र,महिला आयोग महाराष्ट्रा प्रतीलीप सादर केले असून मारहाण करणा-या कर्मचा-यांवर एट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल न केल्यास आमरण उपोषण केले जाईल असा इशाराही स्थानिक नागरिकाणी दिला आहे.मुकूटबन पोलिस स्टेशनला निवेदन देतेवेळी पैकु टेकाम,महादेव टेकाम, सुनील टेकाम,आनंद टेकाम, राजेश्वर टेकाम,सुंदर टेकाम, किसन टेकाम,जंगा मडावी,सुरेश आत्राम,लक्ष्मण कोडापे,सीमा टेकाम,भोनू टेकाम,लखमा टेकाम,प्रेमीला टेकाम,मादीबाई टेकाम, लक्ष्मी टेकाम,अनुसया आत्राम,लिलाबाई आत्राम सह शेकडो नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here