वणीत जागतिक संगीत दिन

0
415

वणीत जागतिक संगीत दिन

सागर झेप संस्थेच्या वतीने जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने संगीततज्ञ जयंत कुचनकर यांच्याकडून मिळालेला शहरातील संगीत वारसा समोर नेणारे अभिलाष राजूरकर यांचे संगीत क्षेत्रात भरीव योगदान आहे. नवीन कलावंत घडविण्यासाठी व वेगवेगळे उपक्रम राबविण्यात सक्रिय योगदान देण्याकरिता मान्यवरांनी शाल श्रीफळ पुष्पहाराने त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव कार्यक्रमाचे अध्यक्ष नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार व प्रमुख पाहुणे जैताई मंदिर चे सचिव माधवराव सरपटवार यांच्या हस्ते करण्यात आला.
अनेक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत असणारे नामदेव ससाणे यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच अमोल बावणे व यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले चंदन पळवेकर यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
जागतिक संगीत दिन असल्याने ताला-सुरांची छोटेखानी मैफलही रंगली. यात उपस्थित गायकांनी अनेक गीते सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर झेप संस्थेचे अध्यक्ष कासार सागर मुने व आभार नितेश चामटे यांनी मानले. यावेळी शाम चौधरी, सतीश वैद्य, किशोर घुले, विद्यार्थी कु संजना घुले, ऋतुराज चौधरी, विजय वासेकर, सागर बरशेट्टीवार, आशिष घनकसार, विवेक खिराटकर व गगन वैद्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here