अग्रवाल परिवारास ताडोबा अभयारण्यात जंगल सफारी करणे बेतली जिवावर

0
622

अग्रवाल परिवारास ताडोबा अभयारण्यात जंगल सफारी करणे बेतली जिवावर

१२ वर्षीय मुलीचा अपघातात जागीच मृत्यू तर ४० वर्षीय काकाचा नागपूर ला नेताना वाटेत मृत्यू

चिमूर । आशिष गजभिये : दिनांक ०१/१२/२०२० ला नागपूर वरून ताडोबा अभयारण्यातील कोलारा जवळील देवरी येथील वन्य विलास या रिसॉर्ट मध्ये ऑनलाईन बुकिंग करून ताडोबा जंगल सफारी करीता जात असतांना सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी चिमूर जवळील बांबू रिसॉर्ट पासून ५०० मिटर अंतरावरील तुकुम चा भडगा नाला मध्ये फोर्ड ची एन्डोव्हर कार १२ वर्षीय सना अभिषेक अग्रवाल राहणार नागपूर येथील असून वळण एस या आकाराचे वळण मार्ग असून नव्याने रोडचे काम सुरू असल्याने वाहनवरून नियंत्रण सुटले व कार नाल्यात पलटी मारल्याने मुलगी जागीच मरण पावली असून दुसरे तिचे काका अमिनेश अशोक अग्रवाल वय ४० वर्षे यांना नागपूर येथे अँबूलन्सने उपचाराकरिता नेताना उमरेड जवळ वाटेत मृत्यू झाला. तर या कार मध्ये चालक ज्ञानेश्वर वसंता नरड वय ३८ वर्षे सह मिनू अमिनेश अग्रवाल ३२ वर्षे , नेहा आशिष अग्रवाल वय ३६ वर्षे , ईशु अनिमेश अग्रवाल वय १७ वर्षे असे एकूण ६ जण होते.या सहा पैकी २ जनांचे मृत्यू झाले असून ४ जणांवर उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here