राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आढावा व नियोजन बैठक

0
391

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आढावा व नियोजन बैठक

पोंभुर्णा, जयदेव मडावी
आज पोंभुर्णा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची आढावा बैठक घेण्यात आली.

सोबतच दिनांक १८ नोव्हेंबर २१ ला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मुल येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या कार्यक्रमात या तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने येण्याचे देखील नियोजन करण्यात आले.

यावेळी या तालुक्यातील युवकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये प्रवेश केला. या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी सर्वांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शहर अध्यक्ष भुजंग भाऊ ढोले, रा.यु.काँ. तालुका अध्यक्ष गुरुदेव मडावी, महिला तालुका अध्यक्षा सोनाली भुरसे, जेष्ठ नेते अशोकराव सातपुते, जगन्नाथ कोहळे, संजय येलूरवार, दिनेश नैताम, हरिभाऊ चामेवार, राकेश लिंगलवार, सावन धोडरे, राकेश ढोले, विजय जबूलवार, दीपक कोकोळे, पियुष ढोले, हर्षल सातपुते, गंगाधर डोनेवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here