राज्यातील विविध नेत्यांच्या सुरक्षेत मोठे बदल 

152

राज्यातील विविध नेत्यांच्या सुरक्षेत मोठे बदल 

 

 

शिंदे ,फडणवीस सरकारकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील विविध नेत्यांच्या सुरक्षेत मोठे बदल करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीतील तब्बल महत्वाच्या १५ नेत्यांची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे.

शिंदे सरकारच्या या निर्णायावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. गेले काही दिवसांपूर्वीचं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला होता मात्र जितेंद्र आव्हाडांच्या सुरक्षेत कुठलेही बदल करण्यात आलेले नाही. तर शिवसेनेचे नेते आणि उध्दव ठाकरेंचें निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तरी मलिंद नार्वेकरांची ही वाढीव सुरक्षा अनेकांच्या भुवया उंचवणारी आहे. तरी वाढीव सुरक्षेनंतर नार्वेकर शिंदे गटास आपला पाठींबा दर्शवणार का यावर पुन्हा चर्चा रंगल्या आहेत.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई, संजय राऊत , भास्कर जाधव तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ , जयंत पाटील , धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ तसेच कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात , नितीन राऊत , नाना पटोले, सतेज पाटील , विजय वडेट्टीवार यांची सुरक्षा काढून टाकण्यात आली.

शिंदे सरकारच्या या निर्णायामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील दोन ते तीन महिन्यात शिंदे सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णायांना स्थगिती देण्यात आली होती. यावरुन राजकीय वातावरण तापले असतानाच आता महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. तरी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षातील नेत्यांची सुरक्षा काढल्याने राज्यातील राजकीय वातवरण तापण्णाची शक्यता आहे.

advt