येनबोळी प्रवेशद्वाराच्या नामकरणाची प्रतिक्षा

0
799

येनबोळी प्रवेशद्वाराच्या नामकरणाची प्रतिक्षा

 

 

राज जुनघरे
बल्लारपूर :- येथून जवळच अवघ्या सात कि.मी. अंतरावर वसलेल्या व शैक्षणिक द्रुष्ट्या सर्व दुरवर परिचित असलेल्या येनबोळी चौकाचे भुषण म्हणजे पळसगांव चे प्रवेशद्वार. राज्य महामार्गाच्या बांधकामात जुने प्रवेशद्वार तोडून नव्याने तयार झाले असले तरी या प्रवेशद्वाराला कुणाचे नाव देणार ? हा विषय नागरिकात चर्चिल्या जात असून नागरिकांना उत्सुकता लागली आहे.
येनबोळी, पळसगांव या दोन्ही गावाचा इतिहास पाहता पळसगांव निवासी स्व. सोनबा पाटील वासाडे ( शिक्षण महर्षी ) होऊन गेले. सन २००४ -०५ दरम्यान च्या काळात सोनबा वासाडे यांच्या स्मृतिंना उजाळा देण्यासाठी येनबोळी चौकात पळसगांव मार्गांवर प्रवेशद्वाराची निर्मिती झाली आणि प्रवेशद्वारावर स्वर्गिय सोनबाजी पा. वासाळे यांचे नाव कोरण्यात आले. मागिल इतिहासाची पलटताच निरजन भकास येनबोळी या चौकाची मुहूर्त मेळ रोवणारे आणि कृषी जीवन विकास प्रतिष्ठान च्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलांना दुर शिक्षणासाठी जावे लागू नये म्हणून कर्मवीर विद्यालयाची स्थापना केली.आज इथे विद्यालय, महाविद्यालय, सिबीएसी बोर्डाचे विद्यालयाच्या वास्तू डौलाने उभ्या आहेत. हळूहळू नागरिकांनी इथे येऊन छोटीशी वसाहत निर्माण झाली. आज येथे पळसगांव, मानोरा, इटोली, आमळी, कळमना, गिलबिली, मोहाळी, आसेगांव, उमरी विहिरगाव, कोरटीमक्ता, दहेली, कवळजई, कोठारी, बल्लारपूर, विसापूर, तोहोगाव आदी गावातील विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येतात. हा ज्ञानार्जनाचा ठेवा त्यांनी सन १९७२ च्या काळात निर्माण केला. सन १९८० ते ८५ मध्ये ते चंद्रपूर पंचायत समिती सभापती म्हणून कार्यरत होते.
अशा विभुतीचे स्मरण रहावे म्हणून प्रवेशद्वारावर सोनबा पाटलांचे नाव कोरल्या गेले होते. नुकतेच मागिल दोन वर्षांपासून बामणी ते नवेगाव हा राष्ट्रीय महामार्ग दुपदरी करण मंजुंरीस आला व महामार्ग रूंदीकरण करण्याच्या कामाला सुरुवात झाली. यात सोनबा पाटील वासाडे स्मृती द्वार तोडण्यात आले. बालाजी कंटरक्शन कंपनीने मार्गाचे काम पुर्णत्वास येताच त्याच जागेवर नव्या प्रवेशद्वाराची बांधणी केली आहे. बांधकाम पुर्णत्वास आले असले तरी या भागातील जनतेला एकच प्रश्न भेडसावत आहे.तो म्हणजे या प्रवेशद्वाराला नाव कुणाचे दिल्या जानार ? जुण्या स्मृती जपल्या जानार की त्या अस्तित्वातून कालबाह्य ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या भागातील जनतेत चर्चेचा विषय ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here