चेक बोरगाव तंटामुक्त समिती ची निवड अवैध घोषित करा

0
546

चेक बोरगाव तंटामुक्त समिती ची निवड अवैध घोषित करा

गौतम झाडे यांची संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे मागणी

 

राजुरा/गोंडपीपरी – दिनांक 15 सप्टेंबर 2019 ला बोरगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेऊन करण्यात आलेली तंटामुक्ती समितीची निवड शासकीय नियमांचे उल्लंघन करणारी असून या ग्रामसभेत तंटामुक्त समितीचे गठण करण्यात आले ही ग्रामसभा सुद्धा covid-19 नियमाचे उल्लंघन करणारी होती .वरील दोन्ही बाबी अतिशय गंभीर असून आपण त्वरित या बाबींची चौकशी करून अर्जदाराच्या मागणीप्रमाणे कारवाई करावी निवड झालेली तंटामुक्ती समिती अवैध ठरवून पुन्हा गठित करावी अशी मागणी काँग्रेस अनुसूचित जाती-जमातीचे गोंडपिपरी तालुका अध्यक्ष गौतम तायडे यांनी संवर्ग विकास अधिकारी केली आहे.


सदर निवडीच्या वेळी ग्रामपंचायत कार्यालयात कोणत्याही नागरिकांची ऑक्सीमीटरचा वापर करून कोणत्या प्रकारची तपासणी करण्यात आली नाही .शारीरिक अंतराचे पालन करण्यात आले नाही शेकडो नागरिक एकत्र बसले होते.
तंटामुक्त गाव समितीचे एक तृतीयांश पेक्षा अधिक सदस्य एकाच वेळी बदलता येत नाही असा नियम असताना मात्र चेक बोरगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत या नियमांचे सर्रास उल्लंघन करून जुन्या समितीचे नियम सर्व सदस्य बदलून नव्या सदस्यांचा समावेश करन्यात आले आहे. त्यामुळे शाशकीय नियमांची पूर्णपणे पायमल्ली झालेली आहे .त्यामुळे चौकशी करून तंटामुक्त समितीचे नव्याने पुनर्गठन करावे अशी मागणी गौतम झाडे यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here