बलात्काराचा प्रयत्न ; आदिवासी बांधवांची गुन्हेगारास कडक शिक्षा देण्याची मागणी

0
647

बलात्काराचा प्रयत्न ; आदिवासी बांधवांची गुन्हेगारास कडक शिक्षा देण्याची मागणी

 

कोरपना /प्रतिनिधी

गडचांदुर येथील वार्ड क्रमांक ०४ चर्च जवळील बल्लू उर्फ खलील शेख ह्या राक्षसी प्रवृत्तीच्या गुन्हेगार हा मागील दोन वर्षा अगोदर वार्डातील मेश्राम नामक वृद्ध महिलेचा बलात्कार करून हत्या केल्याच्या गुन्ह्यात गुन्हेगार असून. त्यातून सुटका झाल्यानंतर सदर गुन्हेगाराने गडचांदूर शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. शहरात असे अनेक महिलांवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. परंतु इतरांनी स्वतःची प्रतिष्ठा जपत गुन्हा नोंदवीला नाही. परंतु दिनांक २६ १०/२०२२ रोजी सायंकाळी ८ च्या सुमारास आमच्या वॉर्डातील आदिवासी समाजातील पल्लवी ईश्वर तोडासे जी वार्ड क्रमांक ०२ मध्ये ताजने यांचे घरी, भाड्याने वास्तव्यास असून सदर आरोपीने तिच्या घरी पती नसल्याचे पाहून, तिच्या घरात घुसून बलात्कार करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु सदर महिलेने हिसका देऊन आरडाओरड केल्याने आरोपीने बलात्कार करून जीवे मारून टाकण्याचे धमकी देत तिथून पसार झाला. परंतु या राक्षसी विकृती असलेल्या बल्लू उर्फ खलील शेख हा आरोपी वार्डात उभा राहून अश्लील चाळे करून महिला व मुलींचे अनेकदा छेड काढली. अशी व्यक्ती मानवी समाजाला काळीमा फासणारी असून. सदर आरोपीला तात्काळ अटक करून ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद घेऊन. आजन्म जिल्हा बंदी तडीपारी करण्यात यावी अन्यथा संपूर्ण महिला सुरक्षा करिता आम्हाला कायदा हातात घेऊन महिलांना संरक्षण द्यावे लागेल व होणाऱ्या नुकसानीस आपण स्वतः जबाबदार राहाल अशी मागणी सर्व आदिवासी बांधवांनी केली आहे. ताराम कुरसंगे .प्रमोद गेडाम .दिलीप कुडमेथे .महालिंग कंठाळे .सुरेश कांबळे .ऋषिकेश भारती .चंद्रकला तोडासे. छाया तलांडे. मंदा आत्राम .जया तोडासे .इंदिरा तोडासे .रत्नमाला चहारे .पुतलाबाई शेख. अनिल सिडाम .मर्गमंजलवार. ईश्वर तोडासे .नीलिमा तोडासे. विकास तोडासे. सतीश तोडासे. वृंदा आत्राम .पुंजाबाई . ज्योती कंठाळे .उमा कंठाळे. संतोष आत्राम .सचिन तुळासे. शोभाबाई मेश्राम .शालू शेंडे .तानेबाई. त्याच पद्धतीने वार्डातील असंख्य महिला व पुरुष पोलीस स्टेशन गडचांदूर येथे उपस्थित होते यादरम्यान पोलीस स्टेशन गडचांदूर चे ठाणेदार सत्यजित आमले साहेबांनी आरोपी बल्लू उर्फ खलील यास लवकरात लवकर अटक करून संबंधित गुन्ह्याअनुसार कलमान नोंदवून कारवाई करण्याविषयी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here