शाळे बाहेरची शाळा या उपक्रमाअंतर्गत आजती येथील चिमुकलीची आकाशवाणीवर मुलाखत

0
447

शाळे बाहेरची शाळा या उपक्रमाअंतर्गत आजती येथील चिमुकलीची आकाशवाणीवर मुलाखत

अनंता वायसे । हिंगणघाट तालुक्यातील आजती येथील अंगणवाडीतील चिमुलकलीची विभागीय आयुक्त नागपूर विभाग व विद्या प्राधिकरण नागपूर व जिल्हा परिषद वर्धा आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या सहकार्याने “शाळे बाहेरची शाळा” हा उपक्रम राज्य भर तसेच वर्धा जिल्ह्यात सुरू आहे. सादर कार्यक्रम नागपूर आकाशवाणीच्या “अ” केंद्राहून आठवड्यातून तीन दिवस दर मंगळवार, गुरुवार, शनिवारी सकाळी 10:30 वाजता प्रसारित होत .असून कोरोनाच्या या भीषण संक्रमण काळामध्ये सर्व शाळा व अंगणवाडी बंद असल्याने आजती या गावांमध्ये प्रथम संस्थेमार्फत व शाळेतील शिक्षकांच्या मार्फत तसेच अंगणवाडी सेविका कडून ऑनलाइन अभ्यास विद्यार्थ्यांना पोहचवून गावातील स्वयंसेवक स्वाती मानकर , प्रगती गलांडे , अंगणवाडी क्रमांक 2 च्या सेविका नीता भोमले व मदतनीस मनीषा खेडकर , माता पालक मुलांना घरी अभ्यासात मदत करतात .तसेच शाळे बाहेरची शाळा उपक्रमाअंतर्गत प्रसारित होणारी शैक्षणिक माहिती त्याच्या पर्यत पोहोचविण्यास मोलाची मदत केली. शाळे बाहेरची शाळा या उपक्रमाअंतर्गत आकाशवाणीद्वारे प्रसारित झालेल्या 128 व्या भागामध्ये प्रियल प्रदीप वाघमारे या चिमुकलीने मुलाखत सादर केली.
प्रियल वाघमारे या चिमुकलीचे पंचायत समिती सदस्य श्री. संभाजी देवढे , ग्रामपंचायत सरपंच सौ. सीमाताई देवढे , अंगणवाडी पर्यवेक्षक रंजना जवादे , अंगणवाडी सेविका नीता भोमले ,मदतनीस मनीषा खेडकर, व शिक्षक , प्रथम संस्थेच्या जिल्हा समनव्यक श्वेता धोटे , अनंता वायसे व त्यांच्या टीमने खुप खुप शुभेच्छा दिल्या.

मनोगत :- प्रियल ची आई अनिता वाघमारे यांनी सांगितले की आम्हाला प्रथम संस्थेकडून कोरोनाच्या काळात सुद्धा ऑनलाइन अभ्यास व शाळे बाहेरची शाळा यातून मी माझ्या मुलीला घरी अभ्यास करून घेता येत आहे.याच्या फायदा आमच्या गावातील सर्व विद्यार्थ्यांना झाला आहे . आम्हाला वारंवार प्रथम संस्थेचे अनंता वायसे फोन द्यारे मुलांच्या अभ्यासबद्दल चर्चा करतात. आणि अंगणवाडी सेविका नीता भोमले यांनी सुद्धा मुलांच्या शिक्षणासाठी या कोरोनाच्या काळात घरी येऊन खुप मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here