अमराई वार्डाच्या भुस्खलनग्रस्तांच्या विविध समस्यांचे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या माध्यमातून निराकरण

0
479

अमराई वार्डाच्या भुस्खलनग्रस्तांच्या विविध समस्यांचे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या माध्यमातून निराकरण

 

घुग्घुस येथील अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त कुटुंबातील महिलांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची भेट घेतली व घरभाडे मिळण्यासाठी समस्या येत असल्याचे सांगितले. सोबतच भेडसावत असणाऱ्या विविध समस्या सांगितल्या.

त्यांनी तत्काळ दखल घेत मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांच्याशी संपर्क साधून न.प. कार्यालयात सर्व समस्याग्रस्त नागरिकांना घेऊन जाऊन मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांच्याशी चर्चा केली व भुस्खलनग्रस्तांची समस्या सोडविली.
त्याअनुषंगाने भुस्खलनग्रस्तांना आता घरभाडे मिळनार आहे. सोबत विविध समस्या सुटणार आहेत.

अडचणीत आलेल्या प्रत्येक भुःखलनग्रस्त कुटुंबाला १८ हजार रुपये प्रमाणे सहा महिन्याचे घरभाडे मिळणार आहे.

जवळपास २६ भुस्खलनग्रस्त कुटुंबियांना विविध कारणामुळे घरभाडे मिळाले नाही. त्यामुळे भुस्खलनग्रस्त कुटुंबातील महिलांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची भेट घेऊन समस्या सांगितली.

घुग्घुस येथे अमराई वार्डात २६ ऑगस्ट रोजी भुस्खलन होऊन गजानन मडावी यांचे घर जमिनीत धसले होते. त्यामुळे येथील १६० कुटुंबियांना सुरक्षेच्या दृष्टीने इतरत्र हलविण्यात आले होते.

या प्रसंगी विनोद जंजिर्ला, अजगर खान, राजेश मोरपाका, हेमंत कुमार, पवन कारले तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here