आवाळपुर येथे युवकाची गळफास घेत आत्महत्या

0
587

आवाळपुर येथे युवकाची गळफास घेत आत्महत्या

बिबी: आवाळपुर येथील एका तरुण युवकाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. रविवार (दि. १२) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पुढील तपास गडचांदूर पोलिसांकडून केला जात आहे. अक्षय बंडू पोहनकर (२१, रा. आवाळपुर, ता. कोरपना) असे मयत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास मेजर ज्ञानेश्वर मडावी करत आहेत.वृत्त लिहेपर्यंत आत्महत्येच कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here