शक्तिशाली स्फोटाने हादरले सास्तीचे गावकरी

385

शक्तिशाली स्फोटाने हादरले सास्तीचे गावकरी

धोपटाळा खुली कोळसा खाण; नागरिकांत भीतीचे वातावरण, वेकोलिविरोधात नागरिकांत संताप

 

राजुरा, ता. ३० : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रात नव्याने सुरू झालेली सास्ती भूमिगत खणांच्या धोपटाला खुल्या कोळसा खाणीत रूपांतर झाले. या कोळसा खाणीत गत तीन-चार दिवसांपासून शक्तिशाली सुरुंग स्फोटाने खाणी शेजारीच असलेल्या सास्ती गावाला मोठा धोका निर्माण झाला आहे. स्फोटाच्या आवाजाने व हादऱ्याने नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत.

सायंकाळी चार ते साडेचार वाजता होणाऱ्या या स्फोटाने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. ग्रामवासी अगोदरच सास्ती कोळसा खाणीच्या ब्लास्टिंगने त्रस्त असताना आता नव्याने हा त्रास सुरू झाला आहे. यामुळे नागरिक दहशतीत आहे. सास्ती व आता धोपटाला अशा दोन्ही कोळसा खाणीच्या मधोमध गाव आहे. या गावातील नागरिक गेल्या चार दिवसांपासून दहशतीत आहे. गावात जुनी भूमिगत कोळसा खाण मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. गाव खालून पूर्णतः पोखरून आहे.

त्यात नव्या खुल्या कोळसा खाणीने व तेथील शक्तिशाली स्फोटाने गाव जमीनदोस्त तर होणार नाही ना अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे. धूर, धूळ, प्रदूषण याचा सामना करावा लागणाऱ्या सास्तीवासींना आता स्फोटाचाही त्रास सहन करावा लागत आहे. हादन्याने घरांना भेगा पडून परे जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. घरातील लोकांना जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागत आहे.

भविष्यात वित्त व जीवित हानी झालीच तर वेकोलि त्याला सर्वस्वी जबाबदार राहणार असल्याचे मत सरपंच रमेश पेटकर यांनी व्यक्त केले.वेकोलिने लोकांच्या जीवाशी खेळू नये.येथे होणारे अधिक शक्तिशाली स्फोट वेळीच थांबवावे, गावाचे योग्यस्थळी सोयीसुविधा देऊन पुनर्वसन करावे नाहीतर वेकोळीविरोधात आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

advt