मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर संस्थेच्या वतीने मुल तालुक्यातील नांदगाव येथे मॉडेल प्रदर्शनी

0
454

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर संस्थेच्या वतीने मुल तालुक्यातील नांदगाव येथे मॉडेल प्रदर्शनी

 

 

मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. श्री. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक कु. निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर व मुल येथील शाळा मधील मूल तालुक्यात “SCALE” कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी “खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास” हा उपक्रम मागील वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे.
उपक्रमाचे विषेश म्हणजे हा उपक्रम शाळेत शिक्षकांच्या सहकार्यने राबविला जात आहे.

 

विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजविणे, माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे व मुलींचे लग्नाचे वय वाढविणे अशा हेतूने मॅजिक बस संस्था चंद्रपूर जिल्ह्यात काम करीत आहे. मुल येथे 10 ऑगस्ट 2022 ला ‘क्रांती दिन’ या दिवसा निमित्ताने नांदगाव येथे विद्यार्थ्याना मे महिन्यातील सत्रामध्ये दिलेल्या गृहपाठाची प्रदर्शनी ठेवण्यात आली. त्यामधे बाबराळा,बोंडाळा बुज, चांदापूर,आणि नांदगाव या गावातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.त्यात स्वागत गीत, शिक्षकांचे तसेच पालकांचे मॅजिक बस कार्याविषयी चे मनोगत घेण्यात आले. तसेच ग्रामपंचायत नांदगाव व पालक वर्ग यांच्या वतीने मॅजिक बस च्या कार्याचा शाल श्रीफळ आणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.

 

कार्यक्रमात गावातील सरपंच मान.कु.हिमानी वाकुळकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेशभाऊ इनमवारजी , जी.प.हाय.स्कूल मुख्याध्यापक मान. बोरिकर सर व शिक्षकवृंद , अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,पालकवर्ग, तसेच शाळकरी मुल यांची उपस्थिती होती. मॉडेल प्रदर्शनी मधे तिन नंबर काढून त्याना बक्षिश देऊन गौरविण्यात आले तसेच प्रोत्साहन पर दोन बक्षीस आणि सहभागी विद्यार्थ्यांना देखील बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन बालपंचायतिने पुढाकार घेउन केले.तसेच यामधे संचालन करण्यापासून तर आभार प्रदर्शन देखील बालपंचायतिने (शालेय मंत्रिमंडळ) केले .समुदाय समन्वयक रवि सामावर आणि बादल बांबोळे तसेच बाहेर गावातील समुदाय समन्वयक, आणि शाळा सहाय्यक अधिकारी शुभांगी रामगोनवार, दिनेश कामतवार, संदेश रामटेके यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here