गॅस सिलेंडरची अंतिम यात्रा काढत काँग्रेसने केला दरवाढीचा निषेध
घुग्घुस : अच्छे दिनाचे गाजर दाखवीत सत्तेत आलेल्या भाजप सरकारने देशातील नागरिकांचे जगणंच मुश्किल केलं आहे. मोदी शासनाच्या काळात महागाईने उच्चांक गाठला असून देशातील सर्व सामान्य नागरिकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे. एकीकडे बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतांना दुसरीकडे महागाई आकाशाला भिडत आहे.
नुकतेच घरगुती स्वयंपाक गॅसच्या किमतीत पन्नास रुपयेने वाढ झाली असून व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत साडे तीनशे रुपयांची वाढ करण्यात आली असून या महागाईचा निषेध करण्यासाठी शहर काँग्रेस तर्फे स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरला तिरडीवर झोपवून कफन चढवून शहरातील मुख्य मार्गावर विधिवत अंतिम यात्रा काढून अभिनव आंदोलन करून महागाई कडे लक्ष वेधण्यात आले. मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
सदर आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले याप्रसंगी काँग्रेस नेते पवन आगदारी,ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, कामगार नेते सैय्यद अनवर, युवा नेते सुरज कन्नूर, सुधाकर बांदूरकर,अलीम शेख,शेख शमीउद्दीन,मोसीम शेख, रोशन दंतलवार,विजय माटला,अनिरुद्ध आवळे,अरविंद चहांदे, सिनू गुडला,शहजाद शेख,देव भंडारी,अभिषेक सपडी, नुरुल सिद्दिकी, रोहित डाकूर,बालकिशन कुळसंगे,सुनील पाटील, रफिक शेख,अमित सावरकर,कपिल गोगला,अंकुश सपाटे, रंजीत राखुंडे सौ.पदमा त्रिवेणी, सौ. संगिता बोबडे,सौ.यास्मिन सैय्यद,सौ.ज्योत्स्ना सूर,दुर्गा पाटील,सौ.मंगला बुरांडे,निर्मला कामतवार,गिताबाई दुर्योधन, सुमित्रा कामतवार, मंगला पालेवार, विश्वास अम्मा,राम बाई, अनिता टिपले,सोनिया बरडे, सरस्वती कोवे,बुध अम्मा व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.