मान्यता नसतांनाही प्रयोगशाळा परिचरची केली नियुक्ती -उपाध्यक्ष खोब्रागडे यांनी केला पत्रकार परिषदेत आरोप

193

 

-बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुउद्देशीय शिक्षण संस्था देवाडा खुर्द संस्थेचा भोंगळ कारभार

पोंभूर्णा :- तालुक्यातील देवाडा खुर्द‌‌‌ येथील बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुउद्देशीय संस्था द्वारे संचालित गोंडपिपरी तालुक्यातील वडकुली येथे एक व दुसरी मूल तालुक्यातील चिचाळा येथे अशा दोन शाळा सुरू आहेत. या शाळेमध्ये प्रचंड गोलमाल, अपरात्र करण्यात आली असून संस्थाध्यक्षाने आपल्या मनमर्जीने कामकाज करून कुणालाही विश्वासात न घेता, कुठलाही ठराव न घेता व वयक्तीक मान्यता नसतांना सुद्धा बनावट कागदपत्रे सादर करून दोन पदांची नियुक्ती केलेली आहे.
तर काही ठराव स्वमर्जीने घेण्यात आले आहे.यात संस्थेचे ऑडिट सुद्धा आजपर्यंत करण्यात आले नसल्याचा आरोप करीत संस्थेचे अध्यक्षांना पदावरून खाली करण्यात यावे अशी मागणी पोंभूर्णा येथे आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे उपाध्यक्ष कवडू खोब्रागडे यांनी केले आहे. चक्क संस्थेचे उपाध्यक्ष यांनीच संस्थेविरोधात तक्रारी केल्या असल्यामुळे प्रकरण खूप चिघळण्याची शक्यता आहे.
बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुउद्देशीय शिक्षण संस्था देवाडा खुर्द च्या वतीने दोन शाळा सुरू आहेत. यात वडकुली येथील राणी दुर्गावती विद्यालय व राणी दुर्गावती विद्यालय चिचाळा या दोन्ही शाळेत प्रयोगशाळा परिचर या पदासाठी अध्यक्ष व सचिवांनी संस्थेतील सभासदांना काहिही न विचारता व बनावट कागदपत्रे सादर करून अमन थेरकर व सोनू मेश्राम यांची नियुक्ती केली आहे.एवढेच नव्हे तर वयक्तीक मान्यता नसतांना सुद्धा अनुदानास पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या यादिमध्ये वरील नावे समाविष्ट करून संस्थेची फसवणूक केली असल्याचा आरोप खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
सदर संस्था चालकांनी अनेक प्रकारचे कारणाने करून संस्थेला बदनाम करण्याचे काम केले आहे. त्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी त्यांच्या मते बिनबुळाच्या असल्या तरी चोरी करणारा चोर कधीच मी चोरी केली असं म्हणून कबूल होत नाही. हे सर्वश्रुत असतानाही त्यांनी सावरा सावरीची बाजू धरली आहे. या शाळा व संस्थेची सखोल चौकशी झाल्यास ही संस्था डब घाईस आल्याशिवाय राहणार नाही. असा दावाही संस्थेचे उपाध्यक्ष केके खोब्रागडे यांनी केला आहे.

———————————
-केलेले आरोप हे खोटे असून.संस्थेत कसल्याही प्रकारची गळबळी झालेली नाही.
– विजय थेरकर , सचिव बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुउद्देशीय शिक्षण संस्था देवाडा खुर्द

advt