घुग्घुस शहरात जेष्ठ नागरिक व यंग चांदा ब्रिगेड महिला तर्फे साफसफाई अभियान

224

घुग्घुस शहरात जेष्ठ नागरिक व यंग चांदा ब्रिगेड महिला तर्फे साफसफाई अभियान

दि.१६ जानेवारी २०२३ सोमवार रोजी जेष्ठ नागरिक संघ व यंग चांदा ब्रिगेडचे महिला सहकार्य करुन घुग्घुस येथील प्रभाग क्रमांक ११ तिलक नगर परिसरातील साफसफाई स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यंग चांदा ब्रिगेडच्या व बहुजन समाज आघाडी महिला शहराध्यक्षा सौ.उषाताई आगदारी तिलक नगर परिसरातील गल्ल्या झाडून, नाल्यांची स्वच्छता करून महिलांना स्वच्छतेची जाणीव करून दिली. चाकरमान्यांनीही गावकऱ्यांना कचरा डस्टबीनमध्ये ठेवणे, गावात घाण इत्यादी पसरवू नये याबाबत सविस्तर माहिती दिली. स्वच्छतेचे महत्त्व माणसाच्या निरोगी जीवनात पूर्ण योगदान आहे, याची जाणीव करून दिली. प्रत्येक व्यक्तीने आपल्या घराबरोबरच आपले गाव आणि शहर स्वतःसारखे स्वच्छ ठेवले पाहिजे, असे सांगितले जाते. त्यामुळे गाव स्वच्छ करण्यासोबतच गंभीर आजारांपासून मुक्ती मिळून निरोगी जीवनाचा आनंद लुटता येईल. असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी जेष्ठ नागरिक संघ सचिव शामरावजी बोबडे, उपाध्यक्ष भाऊराव मोजे, महाराज पांडुरंग जुनारकर, चंग चांदा ब्रिगेडच्या नेत्या व आदिवासी समाज महिला आघाडी शहराध्यक्षा सौ.उज्वला उईके,बहुजन समाज महिला आघाडी शहराध्यक्षा सौ.उषाताई गौतम आगदारी,वनिता निहाल,जेष्ठ नागरिक संतलाल श्रीवास्तव, दादाजी बोबडे, लक्ष्मण ठाकरे, भारत साळवे, मधुकर समर्थ, ज्ञानेश्वर काळे, गंगाराम बोबडे,भोजराज गोरे, जनार्धन गोहाडे, पुंडलिक धांडे, विठ्ठल ताजने, बबनराव कोयाडवार, विठोबा बोबडे, नंदुभाऊ ठेंगणे, चंदू घागरगुंडे, राजेश सपडी,जनाबाई निमकर उपस्थित होते.

advt