यंग चांदा ब्रिगेडच्या आमदार चषक बॉडी बिल्डिंग स्पर्धेची विदर्भात चर्चा

0
736

यंग चांदा ब्रिगेडच्या आमदार चषक बॉडी बिल्डिंग स्पर्धेची विदर्भात चर्चा

 

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजित विदर्भ स्तरीय आमदार चषक बाॅडी बिल्डिंग अजिंक्यपद स्पर्धेची चर्चा सध्या संपूर्ण विदर्भात रंगली आहे. 2010 चे मिस्टर आशिया ठरलेले सुहास खामकर हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षन असून या स्पर्धेसाठी संपूर्ण विदर्भातून बाॅडी बिल्डर नामांकरण दाखल करत आहे.
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विदर्भ स्तरीय आमदार चषक बाॅडी बिल्डिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून 19 मार्च ला शनिवारी चंद्रपूर महानगर पालिकेच्या मैदाणावर ही स्पर्धा संपन्न होत आहे. या स्पर्धेची जय्यत तयारी सुरु असून नागरिकांचाही मोठा प्रतिसाद स्पर्धेला मिळतांना दिसून येत आहे. चंद्रपूरच्या बाॅडी बिल्डरने आपले नाव देशपातळीवर गाजवले आहे. आता विदर्भस्तरीय स्पर्धा चंद्रपूरात होत असल्यामुळे चंद्रपूरच्या बाॅडी बिल्डरांनीही कमर कसली आहे. तर विदर्भातील स्पर्धकही या स्पर्धेसाठी उत्सुक दिसत आहे. एकंदरितच 19 मार्च ला होणा-र्या या स्पर्धेची चर्चा सध्या संपुर्ण विदर्भात रंगतांना दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here