वर्धेत कोरोनासह मॄतकाच्या संख्येत वाढ : ११५ नवे रूग्ण तर ५ रुग्णांचा मृत्यू

0
431

वर्धेत कोरोनासह मॄतकाच्या संख्येत वाढ : ११५ नवे रूग्ण तर ५ रुग्णांचा मृत्यू

एकुण रुग्ण २९८८
एकुण कोरोनामुक्त १४७१
एकुण मॄतक ७२
एॅक्टिव रुग्ण १४४४

अनंता वायसे

वर्धा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचबरोबर मॄतकांची संख्या वाढतीवर आहे. गुरुवारी ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता मॄतकांची संख्या ७२ वर पोहचली आहे.
गुरुवारी जिल्ह्यात एकूण ११५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामध्ये वर्धा तालुक्यात ६८ रूग्णांमध्ये ३८ पुरूष व ३० महिलांचा समावेश आहे. देवळी तालुक्यात ७ रूग्णांमध्ये ३ पुरूष व ४ महिलांचा समावेश आहे. सेलू येथील ५ रूग्णांमध्ये पुरुष २ तर ३ महिला आहे. आर्वी ३ तर कारंजा १ पुरुष, आष्टी ६ रुग्णांमध्ये ३ पुरुष तर ३ महिला कोरोनाबाधित आढळले आहे. समुद्रपूर तालुक्यात ११ रूग्णांमध्ये ९ पुरूष तर २ महिलांचा समावेश आहे. हिंगणघाट तालुक्यात १४ रूग्णांमध्ये ९ पुरूष तर ५ महिलांचा समावेश आहे. एकूण ११५ रूग्णांमध्ये ६६ पुरूष तर ४९ महिलांचा समावेश आहे. तर वर्धेत ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत २९८८ रुग्ण कोरोना बाधितांची संख्या पोहचली तर १४७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले.१४४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here