पोंभूर्णा करकट्टा बोर्डा बोरकर या रोडच्या कामाची मंजुरी देण्यात यावी ओमेश्वर पद्मगिरवार यांची मागणी

0
255

पोंभूर्णा करकट्टा बोर्डा बोरकर या रोडच्या कामाची मंजुरी देण्यात यावी ओमेश्वर पद्मगिरवार यांची मागणी

पोंभुर्णा तालुका अतिदुर्गम तालुका म्हणून शासन दरबारी नोंद असून फार पूर्वी काळापासून पोंभुर्णा येथील जुन्या वस्तीपासून जानारा रोड दुर्लक्षित आहे त्या रोडचे काम चालू करण्यात यावे अशी मागणी ओमेश्वर पद्मगीरीवार यांनी ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र यांना निवेदनाद्वारे केली आहे.
पोंभुर्णा ते कसरगट्टा,बोर्डा बोरकर हा ६ कीलोमिटर रोडणे सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी वर्ग जाऊन आपले व्यवहार सुरळीत करीत होते परंतु सदर बाबत बऱ्याच दिवसांपासून मागणी करून सुद्धा रोडचे काम होऊ शकले नाही सदर रोडमुळे ग्रामीण जनतेला मुख्यालयात पोंभुर्णा येथे कमी वेळेत पोहोचणे शक्य आहे. सहा किमी रस्त्यावर अनेक शेतकरी व कामगार मजूर वर्गाची वर्दळ असते सामान्य जनतेच्या दृष्टीने सदर रोडचे काम सन 2020 या वर्षी अग्रक्रमाने राष्ट्रीय महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मंजूर करून ग्रामीण जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ओमेश्वर पद्मगिरवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here