प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा येथे “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान कार्यक्रम संपन्न

0
386

प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा येथे “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान कार्यक्रम संपन्न

 

कोरपना प्रतिनिधी
आज दिनांक 29/09/2022 रोजी प्रा.आ.केंद्र कवठाळा येथे “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियानाच्या उद्घाटन सरपंच नरेश सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्धघाटन उपसरपंच मंजुषा वरारकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ बावणे सर वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र कवठाळा यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन डॉ. टेंभे सर तालुका वैद्यकीय अधिकारी कोरपना यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या किशोवयीन मुली व ANC यांची तपासणी व समुपदेशन डॉ. तडवी मॅडम वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र कवठाळा यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा शिंदेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एन एन निंबाळकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रा आ केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here