महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे सांस्कृतिक विभाग व समाजशास्त्र विभागातर्फे गरबा स्पर्धेचे आयोजन

0
359

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे सांस्कृतिक विभाग व समाजशास्त्र विभागातर्फे गरबा स्पर्धेचे आयोजन

 

तालुका प्रतिनिधी/रोहन कळसकर
बल्लारपूर – दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे सांस्कृतिक विभाग व समाजशास्त्र विभागातर्फे गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून सौ जयश्री पटेल, सौ. मेश्राम, प्रा. सविता पवार, प्रा. सौ. पल्लवी जूनघरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. कल्याणी पटवर्धन होत्या.

सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या तसेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख व समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शुभांगी भेंडे शर्मा यांनी केले.

या गरबा डान्स स्पर्धेमध्ये एकूण सात गटांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्काराचा मान रॉयल क्वीन ग्रुप यांनी पटकावला यामध्ये जानवी रघुवंशी, संध्या मस्के, संजीवनी वानखेडे, श्रुती आगलावे, श्रुती भगत, दिपाली सातपुते, अलिषा खान, आरती यादव यांचा सहभाग होता. तर द्वितीय पुरस्काराच्या मानकरी एम आर ग्रुप ठरला. यामध्ये मृणाली नळे, ऋतिका मडावी, काजल, अर्पणा अलोने, त्रिशा मेश्राम, राधिका बेनी होत्या. तर तृतीय पुरस्कार गरबा क्वीन्स यांना मिळाला. यामध्ये स्नेहा गोर, आचल टेकाळे, साक्षी पाटील, आस्था सय्यद, महेक उजवाल , विशाखा चौधरी, श्रुती लाडके, रुणाली चिपाडे यांना मिळाला.

या कार्यक्रमाला वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. बालमुकुंद कायरकर, प्रा.विनय कवाडे, प्रा. पंकज कावरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here