अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याची हजेरी, शेतकऱ्यांचे नुकसान

0
460

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याची हजेरी, शेतकऱ्यांचे नुकसान

विरेंद्र पुणेकर

राजुरा : २१ मार्च अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालाय. काढोली, बाबापूर, माणोली या गावांमध्ये अवकाळी पावसानं व वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातलाय. चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहत. काल रात्रीपासून काढोली, बाबापूर, सास्ती, साखरी आणि राजुरा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये हजेरी लावलेली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याची भीती शेतक-यांना आहे. काढणीला आलेल्या पिकांची नासाडी करणारा हा पाऊस असल्याची भावना शेतक-यांनी व्यक्त केलीय हरभरा , ज्वारी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. बाबापूर गावासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्री अवकाळी पाऊस झाला व वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरा वरचे छप्पर उडवून नेले. विजांच्या कडकडाट सह रात्री तब्बल 2 तास पावसाची संततधार सुरू होती.आज सकाळ पासून पाऊस थांबला आला तरी ढगाळ वातावरण आणि रात्री झालेला पाऊस यामुळे थंड वातावरण तयार झाले आहे.जिल्ह्यातील कोलगाव, चार्ली, नीर्ली, चार्ली, पौवनी, गोवारी, नांदगाव, गोयेगाव, चिंचोली जवळी या भागात देखील या अवकाळी  पावसाने हजेरी लावल्यामुळे काही शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here