डेकोरेशन, साउंड सर्विस, कॅटरिंग, बिछायत व्यवसायिकांना मदत द्या-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

0
360

 

डेकोरेशन, साउंड सर्विस, कॅटरिंग, बिछायत व्यवसायिकांना मदत द्या-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी

हिंगणघाट:- ११ ऑगस्ट २०२०
कोरणाच्या प्रादुर्भावाने लॉकडाऊनच्या कालखंडात वर्धा जिल्ह्यातील डेकोरेशन, साउंड सर्विस,कॅटरिंग, बिछायत इत्यादी व्यवसायातील मालक व कामगारांना सरकारतर्फे आर्थिक मदत मिळण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांची भेट घेऊन त्यांच्या अनेक समस्या मंड़ल्या.त्यावेळी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात हिंगणघाट,समुद्रपुर तालुका डेकोरेशन, साऊंड, कॅटरिंग, बिछायत संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने लॉकडाऊनच्या कालखंडात व्यवसाय हात मजुरी करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील नव्हे तर सर्व महाराष्ट्रातील डेकोरेशन ,साउंड सर्विस, कॅटरिंग ,बिछायत इत्यादी व्यवसायातील मालक व कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून जीवन कसे जगावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. उपरोक्त संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचा देखील तात्पुरता व्यवसाय आहे यांना मागील चार महिन्यापासून कवडीचा धंदा करण्याची संधी मिळाली नाही. परिणामी या सर्व व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊन झाल्याने सार्वजनिक धार्मिक व लग्नसमारंभाच्या हंगामातच संचारबंदी लागू करण्यात आली त्यामुळे डेकोरेशन, साऊंड ,कॅटरिंग, बिछायत आदी व्यवसायिकांना आर्थिक फटका चांगलाच बसला आहे त्यामुळेच या लॉकडाऊनच्या काळात मालकासह मजुरांचा सुद्धा आर्थिक संकटाला सामोर जावे लागत आहे.
तसेच ज्या लोकांना व्यवसायासाठी बँकेचे कर्ज उचलले आहे, ते व्यवसाय बंद असल्यामुळे बँकेच्या कर्जाची परतफेड करू शकले नाही. तरी त्यांच्यावर असलेले कर्ज माफ करण्यात यावे असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले.
शासनातर्फे इतर व्यवसायिकांना जीवन जगण्यासाठी जसे आर्थिक मदत देण्यात आली त्याचप्रमाणे या व्यवसायिकांना सुद्धा आर्थिक मदत देण्यात यावी. या मदतीच्या माध्यमातून व्यवसायिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेल. तरी सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात डेकोरेशन, साऊंड, कॅटरिंग अँड बिछायत संघटनेच्यावतीने करण्यात आली. निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष जगदीश पिसे,उपाध्यक्ष बैसवारे, सचिव तपासे, कोषाध्यक्ष गंधारे, सहकोषाध्यक्ष फुलकर, विटाले, कटी, मुळे ,दिवे,म तपासे, कुंभारे इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here