आज शिवापूर(बंदर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

0
469

आज शिवापूर(बंदर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

सामाजिक कार्यकर्ते आदित्य वासनिक यांचे आयोजन

 

तालुका प्रतिनिधी
चिमूर

तालुक्यातील शिवापूर(बंदर) येथे श्री.गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी महोत्सव दोन दिवसीय साजरा केल्या जात आहे. मुरपार पंचायत समिती क्षेत्राचे सामाजिक कार्यकर्ते,उपसरपंच आदित्य वासनिक यांच्या सौजन्याने निशुल्क आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर शनिवारला सकाळी १०.०० ते दु. २.०० वाजेपर्यंत आयोजित केल आहे.

या शिबिरात स्त्री रोग तज्ञ डा. लीना झाडे, नेत्ररोग व रेटिना सर्जन डा. प्रितम बावनकर, जनरल फिजिशियन डा.विनोद चौधरी ,प्राथमिक आरोग्य केंद्र खडसंगी चे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत रणदिवे तपासणी करणार असून या मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शीबिरचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच आदित्य वासनिक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here